गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घराच्या प्रश्नावर आता कृती संघटनेची "हुतात्मा चौकात" काळी टोपी निदर्शने


  मुंबई दि.३०: गिरणी कामगारांच्या रखडलेल्याघराच्या प्रश्नावर गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने आता येत्या ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करुन,"लाक्षणिक काळी टोपी निषेध आंदोलन"छेडण्यात येणार आहे ! निदर्शने झाल्या नंतर काळ्या टोप्या करणार सरकारला बहाल!रामिम संघाचे अध्यक्ष,शिवसेना उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

   राष्ट्रीय मिल मजदूर संघ,रयतराज कामगार संघटना,महाराष्ट्र गिरणी कामगार संघटना, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच या कामगार संघटनांच्या कृती संघटनेची सभा नुकतीच राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या कार्यालयात पार पडून,गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर राजकारणाची पोळी भाजणा-या सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे अनोखे निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे.

 ‌‌ गिरणी कामगार संघटनेच्या समन्वयक,नवा काळच्या संपादिका जययश्री खाडिलकर पांडे, गोविंदरावमोहिते,जयप्रकाश भिलारे,नंदू पारकर, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण,अण्णा शिर्सेकर,जयवंत गावडे, जितेंद्र राणे आदी पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.

    राज्य सरकारच्या १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णया प्रमाणे उपलब्ध होणारे घर घेण्यास गिरणी कामगार अथवा वारस इच्छुक नसल्यास वा त्यास नकार दर्शविल्यास, त्यांचा घर मिळण्या बाबतच्या अर्जाचा यापुढे विचार केला जाणार नाही. हा निर्णय मागे घेऊन गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करावे,अशी या आंदोलनाद्वारे मागणी करून 

 बी.डी.डी.चाळ पुनर्वसन, धारावी पुनर्वसन प्रकल्पातील, ट्रॅंझिस्ट कॅम्पमधील घरे तसेच मुंबईतील बंद एनटीसी गिरण्यांची जमिन गिरणी कामगार घरांसाठी प्राधान्याने मिळाली पाहिजे!आदी मागण्या त्यावेळी करण्यात येणार आहेत.गेल्या दोन वर्षात एकही घर नव्याने न बांधणा-या सरकारला आंदोलनात जाब विचारतांनाच, कृती संघटनेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी! आदी मागण्या करण्यात येणार आहेत.***

 *-गोविंदराव मोहिते*

टिप्पण्या