सानपाडा येथे पूर्वी अपक्ष म्हणून काम करणारे आणि शिवसेनेत आल्यानंतर गेली सहा ते सात महिने वह्या व छत्री वाटप, ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू वाटप असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविणारा युवा सेनेचा नेता अविनाश जाधव यांच्या हातून समाजाची सेवा घडो. असे स्पष्ट उद्गार शिवसेनेचे उपनेते मा. श्री. विजय नाहटा यांनी काढले.
विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीने १० जुलै २०२४ रोजी केमिस्ट भवन येथे समाजसेवक अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व छत्र्या वाटप, जेष्ठ नागरिकांसाठी सोडत,विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे विविध उपक्रम राबविण्यात आले. विजय नाहटा यांच्या हस्ते अविनाश जाधव व प्रियांका जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक चौगुले , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, भाजपाचे समाजसेवक पांडुरंग आमले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रुपेश ठाकूर, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, सचिव राजाराम खैरनार, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, डॉ . विजया. गोसावी, खजिनदार विष्णुदास मुखेकर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, शिवसेनेच्या शहरप्रमुख सुरेखा गव्हाणे, भाजपाच्या श्रीमती कुंजीर, नवी मुंबई निसर्गप्रेमी संस्थेचे अध्यक्ष सुनील नाईक आदी मान्यवरांनी अविनाश जाधव यांच्या सामाजिक कार्यावर आधारित त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सभेचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपविभागप्रमुख देवेंद्र चोरगे यांनी केले, तर आभार विभागप्रमुख विकास गाढवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भावेश पाटील, विभागप्रमुख संजय वास्कर, उपविभागप्रमुख राहुल दाते, शहरप्रमुख विजय माने, उपशहर प्रमूख सुर्यकांत झेंडे, महिला शाखाप्रमुख अनुष्का चोरघे, विभागप्रमुख नंदा येवले, उपशहरप्रमुख सुजाता पाटील इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. या अभिष्टचिंतन सोहळ्याला महिला व पुरुषांची प्रचंड गर्दी होती.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा