पूर्वी ज्येष्ठ नागरिक आरामासाठी कुठेतरी झाडाखाली बसत असत. आपण ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून, भारतात सर्वप्रथम नवी मुंबई येथील सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र उभारले. आजही या विरूंगळा केंद्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. स्वच्छ कार्यालय आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही मागण्या होत्या , त्या मागण्याचे निवेदन मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे आले होते. त्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत. असे स्पष्ट उदगार शिवसेनेचे नेते व विजय नाहटा फाउंडेशनचे संस्थापक मा. श्री. विजय नाहटा यांनी काढले.
विजय नाहटा फाउंडेशनतर्फे ४ जुलै २०२४ रोजी सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला. जवळजवळ ३५० छत्र्यांचे ज्येष्ठ नागरिकांना वाटप करण्यात आले.
विजय नाहटा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांनी आपला जो काही आनंद शिल्लक राहिला असेल तो आनंद घ्यावा. आपल्या कार्यालयासाठी जे काही तुम्ही सांगाल, ते आम्ही देण्यास तयार आहोत. कारण मला अभिमान आहे की, सानपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ हा भारतातला पहिला ज्येष्ठ नागरिक संघ आहे. लवकरच नवी मुंबई येथे ज्येष्ठ नागरिकांची परिषद घेण्याचा विचार आहे, आपणा समोर तो एक आदर्श असेल. ज्येष्ठ नागरिकांनी या देशासाठी खूप काही केलं आहे, आता त्यांच्यासाठी जी काही सेवा देता येईल ती आपण देऊ. तुम्ही केव्हाही हाक मारा, आमचे कार्यकर्ते तुमच्या हाकेला साथ देतील. विजय नाहटा यांच्या हस्ते काही मान्यवरांना छत्री वाटप करण्यात आले
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, सेक्रेटरी खैरनार, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी सीमा बोराडे, शुभांगी सुर्यराव,शामराव मोरे, विवेक कानसे,विसाजी लोके, रामचंद्र पाटील, सावंत, पावगे,स्वप्निल गव्हाणे, राहुल चोरमले, संजय वासकर,अविनाश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा