गोदावरी अर्बन मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिन उत्साहात साजरा

नांदेड (दि. ६ ) आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रे. को -ऑप सोसायटीच्या नांदेड येथील सहकारसूर्य मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन . डिजीटल पद्धतीने सहकार ध्वजाचे अनावरण करण्यात आले.  

        सहकार चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी दरवर्षी  आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा केला जातो. यामाध्यमातून सहकारी संस्थांचे महत्व पटवून दिले जाते तसेच सहकार क्षेत्राची चळवळ समाजात रुजावी उद्देशाने व सहकार क्षेत्राविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.या दिनाच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात आजवर झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला जातो. भविष्यात आणखी लोकांनी सहकार क्षेत्रात काम करावे यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमाध्यातून परावृत्त केले जातो. दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या  शनिवारी हा दिवस साजरा केला जातो यंदा ६ जुलै रोजी येथील  गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिड को -ऑप सोसायटीच्या नांदेड येथील सहकारसूर्य मुख्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार हेमंत पाटील , गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मागर्दर्शनाखाली हा दिवस  मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव ऍड. रविंद्र रगटे, संचालक अजयराव देशमुख सरसमकर, प्रा. सुरेश कटकमवार ,प्रतिष्ठित नागरिक मनोज तिरमनवार , असिस्टंट जनरल मॅनेजर विजय शिरमेवार ,सिनीअर मॅनेजर आनंद संगावार   मार्केटिक मॅनेजर महेश केंद्रे,मॅनेजर देविदास पौळकर, मॅनेजर प्रशांत कदम, मुख्य शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे,यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या