ने.सू.बो. महाविद्यालयात सेवागौरव सोहळा संपन्न.*

अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातील प्राध्यापिका सौ. शालिनी वाकोडकर व कार्यालय अधीक्षक मंगला राजूरकर या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्त सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा. श्री बालासाहेब पांडे उपस्थित होते.  कोषाध्यक्ष श्री कैलासचंद काला,  सहसचिव श्री धनंजय जोशी, प्राचार्य डाँ. सुधीर शिवणीकर, उपप्राचार्य डॉ. सौ. कल्पना कदम, उपप्राचार्य प्रा. अजय संगेवार, पर्यवेक्षक डॉ. सौ. अर्चना भवानकर यांची  प्रमुख उपस्थिती होती.

प्राध्यापिका सौ. वाकोडकर मॅडम यांनी जवळपास दोन दशके महाविद्यालयात सेवा दिली अध्यापन कार्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करण्यात आले. विशेषतः सांस्कृतिक विभाग व नवरात्र महोत्सवातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यालय अधिक्षक मंगला राजूरकर यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. शांत व  व संयमी तसेच कमी बोलण्यातून अचूक काम ही त्यांची विशेषता होती. विद्यार्थी दशे पासून ते कर्मचारी अशी जवळपास 43 वर्ष त्यांचा महाविद्यालयाशी संबंध होता.

सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी दोघींनीही महाविद्यालयात आपला सेवाकाळ आनंदी व समाधानकारक गेल्याचा उल्लेख केला. संस्थेचे व महाविद्यालय प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व सेवानिवृत्त झाले तरी महाविद्यालयास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

अध्यक्षीय समारोपात श्री बालासाहेब पांडे यांनी सेवापूर्ती सत्कारमूर्तींना शुभेच्छा देऊन वर्तमान कर्मचारी वर्गाने प्रभावी व परिणामकारक कार्य करण्याची सूचना केली.

याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी बांधवांनी सौ. वाकोडकर मॅडम व राजुरकर मॅडम यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी माजी उपप्राचार्य डॉ. पंडित सोनाळे, डॉ. दीपक कासराळीकर, प्रा. मुकुंद गिरगावकर, प्रा. नंदकुमार साखरकर, श्री एल. के. कुलकर्णी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. परविंदर कोर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप काळे यांनी केले व स्नेहभोजनानंतर कार्यक्रम समाप्त झाला.

टिप्पण्या