पुणे- मुंबई ची सुविधा श्री गंगा हॉस्पिटल मध्ये नांदेडमध्ये तिसऱ्यांदा किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ;आईने मुलाला दिले जीवनदान..

नांदेड दि 

शरीरातील किडनी फेल झाल्या नंतर रुग्ण व नातेवाईक चिंताग्रस्त असतात.मुंबई -पुणे -हैदराबाद  येथे उपचारासाठी रुग्ण हलविण्यात येतो .,पण किडणी  रोगाची अद्यावत  सुविधा आता नांदेड मध्ये श्री गंगा हॉस्पिटल मध्ये  सुरू झाली असून प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ शहाजी जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण करण्यात आले असून .आईने मुलाला किडणी दान दिली आणि आपल्या लेकराला दुसऱ्यांदा पुनर्जन्म दिला. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर उमरखेड तालुक्यातील गढी गावातील डाखोरे परिवार सद्गगदीद झाले . डॉक्टर साहेब ...आपले  आयुष्यभर ऋण फाटणार नाहीत अशी भावना व्यक्त केली

   नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील यवतमाळ जिल्ह्यातील  उमरखेड  शहराच्या जवळ असलेल्या  गढी या गावातील   अनिल भाऊराव डाखोरे मुंबई येथील मंत्रालयातील जल संपदा विभागात कार्यरत आहेत .  दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे मागील एक वर्षांपासून नांदेड येथे  त्यांच्यावर डायलिसिस सुरू आहे .श्री गंगा हॉस्पिटलमध्ये  प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ 
    डॉ .शहाजी जाधव। यांच्या बद्दल या कुटूंबास माहिती मिळाली.ते डॉ जाधव यांच्याकडे आले त्यांनी  सर्व कुटुंबाला किडनी प्रत्यारोपण बदल माहिती सांगितली  आई सयाबाई डाखोरे यांनी मुलास किडनी देण्याचे सांगितले आणीन १५ दिवसामध्ये  किडनी प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या तपासणी आणि कायदेशीर बाबीची पूर्तता करण्यात आल्या   नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटल येथील किडनी विकार तज्ञ डॉ.शहाजी जाधव यांच्याकडे किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी ठरविले .
 २२ जून अनिल चा "पुनर्जन्म 
---------------------------
 २२ जून २०२४ चा दिवस अनिल   दुसरा जन्म देणारा दिवस ठरला .आई म्हणजे आई  असते दुधावरची साय असते .गोठ्यातल्या वासराची माय असते हे  मातृत्वाच "देणं " पुन्हा अनुभवायला मिळाले..आई सयाबाई यांच्या   किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण अनिल च्या शरीरात करण्यात आले. प्रत्यारोपण झाल्यानंतर दोघांच्याही प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला. 
        प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. राजीव राठोड , डॉ. शिवराज टेंगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे तथा किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. शहाजी जाधव  भूल तज्ज्ञ डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली.
      श्री गंगा हॉस्पिटल चे संचालक अस्थीरोग तज्ज्ञडॉ राजेश्वर पवार  डॉ. विजय कांगणे,  डॉ. शहाजी जाधव,डॉ. संदीप गोरे, डॉ.लक्ष्मीकांत भोपळे, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. सूचिता पेक्केमवार, डॉ. नामदेव चौरे, डॉ. चंदू पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेले श्री गंगा हॉस्पिटल नांदेड परिसरातील किडनी रुग्ण व इत्तर सर्व आजरांच्या रुग्णासाठी एक वरदान ठरत आहे. गंगा हॉस्पिटलमध्ये   किडनी प्रत्यारोपणासाठी ची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी पुणे -मुंबई हैदराबाद येथे जाण्याची आवश्यक नाही तर  डॉ शहाजी जाधव व अनुभवी टीम मुळे येथेच  ही आरोग्य सुविधा उपलब्ध होते आहे
डॉ शहाजी जाधव याच्या  दीडशेहून
 अधिक किडनी प्रत्यारोपण
---------------------------------

किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ  शहाजी जाधव हे नांदेडच्या शिवाजी नगर येशील श्री गंगा हॉस्पीटल येथे कार्यरत आहेत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रेज्यूयट इंस्टीटूट ऑफ मेडीकल सायन्स हे देशातील सर्वात मोठे
 किडनी प्रत्यारोपण  करणारी संस्था आहे .तेथे डॉ जाधव यांनी तीन वर्षे सेवा केली या काळात त्यांनी दिडशेहून अधिक रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण केले आहे  सम रक्तगट व भिन्न रक्त गट अशा अनेक गुंता गुतीच्या व जटील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. दोन महिन्यात तीन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नांदेडच्या वैदयक क्षेत्राची कीर्ती वाढविणारे होय
●किडनी दान मिळेल रुग्णास  "जीवनदान ".
ङाॅ. शहाजी जाधव ,          
बदलत्या जीवनशैलीमध्ये अचानक किडनी फेल होण्याचे निदान  अंतिम टप्प्यात होते त्यामुळे . परंतु रुग्ण व  नातेवाई  घाबरून  जातात .पण नातेवाईकांनी 
 किडनी दान करण्याची तयारी दर्शविल्यास रुग्णाचे प्राण वाचतील व  तो सामन्य आयुष्य जगू शकतो. शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत मिळते त्यामुळे   आर्थिक ताणही कमी होतो .त्यामुळे या रोगाचा नातेवाईक यांनी किडनी दान केल्यास रुग्णास जीवनदान मिळते असे किडनी तज्ज्ञ डॉ शहाजी जाधाव यांनी प्रतिक्रिया नोंदविली.
टिप्पण्या