*प्रत्येक कर्मचाऱ्याने 'आपण समाजाचे देणे लागतो' ही भावना जोपासावी*

 

विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. नरेंद्र चव्हाण 

(श्री.व्ही.पी.ठाकूर सेवापूर्ती गौरव सोहळ्यातील मनोगत) 

नांदेड :(दि.१ मे २०२४) 

          श्री.व्ही.पी.ठाकूर यांनी ३२ वर्षे लिपिक आणि लेखापालाच्या पदावर उत्कृष्ट सेवा बजावली. आकडेमोड करणाऱ्यांना जास्त बोलता येत नाही. प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी 'आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो' ही भावना जोपासावी, असे प्रतिपादन श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण यांनी केले.

           यशवंत महाविद्यालयातील लेखापाल श्री. व्ही.पी.ठाकूर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

           याप्रसंगी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.आत्माराम वानोळे, डॉ. शिवाजी शिंदे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, व्यंकटराव कल्याणकर, श्री.जयभोले यांची उपस्थिती होती.

           पुढे बोलताना श्री.नरेंद्र चव्हाण म्हणाले की, आपण ज्या ठिकाणी सेवा प्रदान करतो; त्या ठिकाणी सदैव कृतज्ञ भाव जोपासयला हवा. मन ओतून कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी शेवटी त्यांनी पुढील शेर सांगून उपस्थितांची मने जिंकली,

*अमृत के पेड को आम नही आते*

*दोस्ती कभी भी पागलोंसे करना*

*समझदार कभी काम नही आते*

            याप्रसंगी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, सेवानिवृत्ती हा घटक प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. निधीचे युटिलायझेशन कायद्याच्या कक्षेत व्यवस्थितरित्या पूर्ण झाले पाहिजे. ऑडिट हे निर्धारित वेळेत व्हायलाच हवे. त्याकरिता व्ही.पी. ठाकूर सारखे कर्मचारी प्रशासनाचे मजबूत सहाय्यक असतात. व्ही.पी.ठाकूर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले.

           वैद्यकीय क्षेत्र आणि समाजकारणातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ.शिवाजी शिंदे यांनी, प्रत्येक व्यक्तीने आहे त्या ठिकाणी समाधानी राहून कार्य करणे महत्त्वाचे असते. स्वतःला, कार्याला व समाजाला न्याय दिला पाहिजे. कर्तव्यामध्ये रमणारी माणसे दुसरीकडे रमत नाहीत; असे मनोगत व्यक्त केले.

            यावेळी डॉ.आत्माराम वानोळे, श्री.जयभोले, आत्माराम राठोड, डॉ.अजय गव्हाणे आदींची समायोचित भाषणे झाली.

           यावेळी श्री.व्ही.पी ठाकूर यांचा उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, डॉ.मीरा फड, डॉ.संजय ननवरे, डॉ.धनराज भुरे, प्रा.नितीन नाईक, डॉ. संगीता भुसारे, प्रा.सीमा शिंदे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, जगदीश उमरीकर, संजय भोळे, गोविंद ठाकूर, संतोष मुगटकर, श्री. हाते, रामचंद्र कऱ्हाळे, डॉ.शिवराज बोकडे, शिक्षकेत्तर महिला कर्मचारी आदींतर्फे सत्कार करण्यात आला.

            या समारोहात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री.व्ही.पी.ठाकूर यांनी शाल व पुष्पहाराने श्री. नरेंद्र चव्हाण, प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, संदीप पाटील, गजानन पाटील, उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, डॉ.दिगंबर भोसले, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.वनदेव बोरकर, डॉ.निरज पांडे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ.मीरा फड, जगदीश उमरीकर, आर.बी. कपाळे, अभय थेटे, गुणवंत धर्माधिकारी आदींचा यथोचित सत्कार केला.

            सोहळ्याचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागातील डॉ.दिगंबर भोसले यांनी केले तसेच आभार देखील मानले. या सोहळ्यात अरुणपाल ठाकूर, श्री. राठोड, डॉ.विजय भोसले, प्रा.मधुकर वाघ, शिवाजी वाडीकर, डॉ.शिवदास शिंदे, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, प्रा.भारतीय सुवर्णकार, प्रा.प्रियंका सिसोदिया, डॉ.अंजली जाधव आदींसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज