नांदेड़:- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिन दिनांक ०१.०१.२०२४ रोजी सकाळी ७.१० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला यावेळी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण संपन्न झाल्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीताचे गायन केले तसेच पोलीस दलाने व अग्निशमन दलाने झेंड्यास सलामी दिली.
ध्वजारोहणानंतर आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मनपाचे माजी पदाधिकारी व माजी सन्माननीय सदस्य, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपायुक्त कारभारी दिवेकर, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु,मुख्य लेखापरीक्षक तु.ल.भिसे, मुख्य लेखाधिकारी डॉ.जनार्दन पक्वाने, लेखाधिकारी शोभा मुंडे, अंतर्गत लेखापरीक्षक सुधीर इंगोले, शहर अभियंता दिलीप आरसुडे, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता सुमंत पाटील,संघरत्न सोनसळे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे,सहाय्यक आयुक्त संजय जाधव, मो.गुलाम सादेक, स्टेडियम व्यवस्थापक तथा क्षेत्रिय अधिकारी रमेश चौरे, उद्यान अधिक्षक तथा क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा फरतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, संभाजी काष्टेवाड, निलावती डावरे व अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे तसेच महापालिकेतील ईतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हो

addComments
टिप्पणी पोस्ट करा