मुंबई दि.३०: आजच्या महाराष्ट्रदिन आणि जागतिक कामगार दिनाच्या कामगारांना राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिट णीस गोविंदराव मोहिते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्र सरकारने सन २०२२ मध्ये ४४ कामगार कायद्याचे रुपांतर" फोर कोड बिलात"केले. कामगारांना जाचक ठरणा-या या कामगार विरोधी बिला विरूद्ध सर्व "केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समिती"च्या वतीने लढ्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.जागतिक कामगार दिन,अन्याया विरूद्ध एकत्र येऊन संघटितपणे लढण्याचे आव्हान करतो,त्या प्रमाणे सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन, अन्याया विरूद्धचा हा लढा यशस्वी करावा,असे आवाहन अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी कामगारांना केले आहे.राज्यात सर्वत्र साजरा होत असलेला महाराष्ट्र वर्धापनदिन चिरायू ठरो,अशा कामगार नेत्यांनी शेवटी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.संघटनेच्या सर्व पदाधिका-यांनीही कामगार वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत•••

addComments
टिप्पणी पोस्ट करा