आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भानेगाव येथे मतदार जनजागृती करण्यासाठी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली . यावेळी विद्यार्थ्यांनी मतदारांना जागरूक करण्यासाठी ,लोकशाही वाचवण्यासाठी ,लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी विविध घोषणा दिल्या व प्रभात फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शंकर डोके, ग्रामपंचायत सदस्य मा. विजय अडकिने ,शा. व्य.समितीचे सदस्य श्री संदीप सिंगनवाड ,ग्रामपंचायत सदस्य बाळू पवार शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एन मोरे व सहशिक्षक श्री पी टी कांबळे सर , विद्यार्थ्यी आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भानेगाव ता. हदगाव येथे कार्यरत असलेले एस.एन.मोरे केंद्रीय मुख्याध्यापक यांनी स्वखर्चातून जवळपास 35 हजार रुपये खर्च करून शालेय सांस्कृतिक मंच ची उभारणी केली .सदर स्टेज बांधण्यासाठी मुख्याध्यापकाने पदरमोड करून व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शंकर दत्ता डोके , उपाध्यक्ष श्री बालाजी रणवीर यांच्या सहकार्याने व शाळेतील शिक्षक श्रीमती डी. एल. कोठेकर श्री. पी.टी. कांबळे सर ,श्री. डी.व्ही. पवळे सर यांच्या सहकार्याने बांधून घेतला .भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून जवळपास सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.यामध्ये भक्ती गीते , प्रार्थना, नृत्य , गोंधळ ,देशभक्तीपर गीते , नाटक, एकांकिका , प्रबोधनात्मक *शेतकरी राजा* नाटीका अशा विविध सांस्कृतिक कलाकृती सादर करून आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन घडवले. जि.प. कें. प्रा. शाळा भानेगाव येथे एकूण 89 विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत असून सदर शाळा कात टाकत असल्याचे शा. व्य. समितीचे अध्यक्ष श्री शंकर दत्ता डोके,उपाध्यक्ष श्री बालाजी रणवीर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. जनार्दन वच्चेवार , श्री. मारोती हुलकाने पालक व ग्रामस्थ आदींनी मत व्यक्त केले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येणाऱ्या काळात तालुक्यात आपला नावलौकिक करेल यात शंका नाही.
addComments
टिप्पणी पोस्ट करा