*'यशवंत ' मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे जलतरण स्पर्धेत सुयश

नांदेड:(दि.२ एप्रिल २०२४)

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना मेक माय ड्रीम फाउंडेशनतर्फे पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक प्राप्त झाले आहेत.

           एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक  आणि ५० मीटर फ्री स्टाइल स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि रोख रक्कम प्राप्त झालेले आहेत.

          या सुयशाबद्दल प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कबीर रबडे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.रामराज गावंडे, डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.वीरभद्र स्वामी, प्रा.सचिन महिंद्रकर,प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा.नरेंद्र कंचटवार, डॉ.एकनाथ मिरकुटे, प्रा.सचिन अपस्तंभ, डॉ.भास्कर देशमुख, डॉ.संगीता मसारे, प्रा.सौ.एल.एस. लंगडापुरे, सेवानिवृत्त वनाधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर, जगन्नाथ महामुने आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज