*सांग तुला भारताचं व्हायचं का नाही?* यशवंत युवक महोत्सवात कवी अरुण पवार यांच्या कवितेने श्रोते भावुक

नांदेड:(दि.१३ मार्च २०२४) 

          प्रेक्षकांची दाद ती कवितेची जायजाद; असे महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी सखारामजी नाईक महाविद्यालय, परळी वैजनाथ येथील प्राचार्य अरुण पवार यांनी कवितेच्या भावविश्वाविषयी मनोगत व्यक्त केले. पालकांनी आणि शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण लपलेले आहेत; ते शोधले पाहिजे, असे प्रतिपादन करताना कविता कशी जन्माला येते, ते सांगताना अमेरिकेतील मित्राशी फेसबुक चॅटिंग करताना 'फेसबुक ' या कवितेत, सांग तुला भारताचं व्हायचं का नाही? अशी साद घालून श्रोत्यांना भावूक केले; तसेच त्यांनी ' पाखरू , तीळ, अफू, मग खेड्याकडे चला या कवितादेखील आपल्या उत्कृष्ट शैलीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तसेच त्यांच्या शेवटच्या 'वाटणी ' या कवितेने रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

            श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात दि.१२ मार्च रोजी आयोजित 'यशवंत युवक महोत्सव' समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.

           याप्रसंगी विचारमंचावर सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कवी शंकर राठोड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, युवक महोत्सव समन्वयक डॉ.संजय ननवरे यांची उपस्थिती होती.

           अध्यक्षीय समारोपात माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी, यशवंत युवक महोत्सवात तरुणाईचा जागर विविध स्पर्धेमधून फुललेला दिसून येतो. महाराष्ट्रातील एक अनोखे युवक महोत्सव म्हणून याचा उल्लेख करता येईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध गुणांवर पैलू पाडण्याचे कार्य केले पाहिजे; तरच विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य समृद्ध व उज्वल असेल, असे मनोगत व्यक्त केले.

           प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, आपल्या विभागातील विद्यार्थी संशोधनामध्ये व मूलभूत बाबींमध्ये कमी पडतात. त्यासाठी स्नेहसंमेलनाचे स्वरूप बदलण्याचे धाडस करण्यात आले. स्नेहसंमेलन सृजनात्मक व संशोधनात्मक असावे. आविष्कार, अन्वेषण, इंद्रधनुष्य या राज्य व राष्ट्रस्तरीय स्पर्धेत आपल्या प्रदेशातील, ग्रामीण भागातील विद्यार्थी यशस्वी व्हावा; म्हणून योग्य निष्कर्ष प्राप्त होण्याच्या धर्तीवर शोधनिबंधवाचन, पोस्टर, मॉडेल सादरीकरण, देशभक्तीपर गीते, रांगोळी आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, असे सांगितले.

          याप्रसंगी नायगाव येथील कवी शंकर राठोड यांनी देखील, 'सखे तुझा चेहरा दिसतो पानापानात' ही कविता आपल्या खुमासदार शैलीत सादर करून रसिकांची मने जिंकली.

            या दिमाखदार सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.संजय जगताप यांनी करून दिला आणि शेवटी आभार डॉ.संजय ननवरे यांनी मानले. विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन डॉ.अजय गव्हाणे, डॉ.मनोज पैंजणे, राष्ट्रीय छात्र सेनेचे संचालक प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा.उत्तम केंद्रे यांनी केले.

           या सहा दिवसीय युवक महोत्सवातील विविध सहा प्रकारच्या स्पर्धा सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.नीरज पांडे, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ.श्रीकांत जाधव यांनी परिश्रम घेतले, तसेच विविध समिती सदस्य डॉ.अजय मुठे, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.मोहम्मद आमेर, डॉ. शिवराज बोकडे, डॉ.दिगंबर भोसले, डॉ.धनराज भुरे, डॉ.मदन अंभोरे, प्रा.प्रियंका सिसोदिया, डॉ.राजरत्न सोनटक्के, डॉ.वनदेव बोरकर, प्रा.ए.आर. गुरखुदे, प्रा.पी.आर.चिकटे, डॉ.निलेश चव्हाण, प्रा.माधव दुधाटे, डॉ.साईनाथ बिंदगे, प्रा.सोनाली वाकोडे, डॉ. रामराज गावंडे, डॉ.बालाजी भोसले, डॉ.एस.एम. दुर्राणी, डॉ.कविता केंद्रे, डॉ.शिवाजी सूर्यवंशी,डॉ.दीप्ती तोटावार, डॉ.शिवदास शिंदे, प्रा.संगीता चाटी, डॉ.संदीप पाईकराव, प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ. सुभाष जुन्ने, डॉ.डी.एस. कवळे, डॉ.मंगल कदम, डॉ.अंजली जाधव, डॉ.सरिता वानखेडे, डॉ.रत्नमाला मस्के, डॉ. शिवराज शिरसाठ, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ. नितीन नाईक, डॉ.पी. बी. पाठक यांनी युवक महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

             या सोहळ्यात विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज