नांदेड दिनांक 12 मार्च 2024 रोजी सायन्स कॉलेज नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त एकदिवसीय युवती स्वसंरक्षण कार्यशाळा ही सायन्स कॉलेज नांदेड व युवती सेना नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. सर्वप्रथम परम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मंडळींच्या हस्ते करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. महाविद्यालया तर्फे व्यासपीठावरील मंडळींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सायन्स महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. युवती कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई होते. कार्यशाळेत प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून नांदेडच्या पोलीस उपनिरीक्षक माननीय सविता खर्जुले, नांदेडच्या शुभम करोति फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय किरण चौधरी, कराटेचे प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट प्राप्त आकाश भुरे, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, युवती सेनेच्या शहर प्रमुख राजश्री नागनाथ कराळे तसेच शहर दामिनी पथक पोलीस उपनिरीक्षक मा. नमिता देशमुख व कार्यशाळेच्या संयोजिका महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून बोलतांना माननीय सविता खर्जुले या म्हणाल्या की स्त्रियांना वैचारिक सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक पातळ्यावर समानता मिळणे व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षमीकरणाची गरज आहे या सर्व गोष्टी मिळणे म्हणजे सक्षमीकरण होय. माननीय किरण चौधरी यांनी शुभम करोति फाउंडेशन ची माहिती करून दिली या मार्फत स्वसंरक्षणासाठी महिला व मुलींनी वेगवेगळे कौशल्य प्राप्त केले पाहिजे. रोहिणी कुलकर्णी यांनी युवती सेना कशा प्रकारे कार्य करते यामधून विद्यार्थिनींनी कशा घडू शकतात व सक्षम होणे काळाची गरज आहे अशी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थिनींनी सक्षम झाले पाहिजे. आत्मबल निर्माण करून स्वतःला जपले पाहिजे. आपण स्वरक्षण स्वतः करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी विद्यार्थिनींना तसेच महिलांना स्वतःच्या संरक्षणाची खूप गरज आहे. स्त्री हीच राष्ट्राची शक्ती आहे. महिला व मुली आदिशक्तीचे रूप आहे. प्रत्येक युवतीने स्व संरक्षणाचे धडे घेतले पाहिजे. या कार्यशाळेत हे धडे देण्यात येत आहे ही कार्यशाळा होण्यामागचा हाच उद्देश आहे असे विचार व्यक्त केले. तसेच याबरोबर युवती कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी केले. कराटेचे प्रशिक्षक श्री आकाश भोरे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले जर जीवनामध्ये कधी वाईट प्रसंग आला तर त्याला सामोरे जाण्यासाठी आपण आपले संरक्षण कसे करावे यासाठी कराटेचे प्रशिक्षण विद्यार्थीनींना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून करून दाखवले. महाविद्यालयातर्फे व्यासपीठावरील मंडळींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सायन्स महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यशाळा पूर्णपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यामध्ये दिलीप कापुरे, शंकर पतंगे, रमेश संद्री यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात या युवती कार्यशाळेत सहभाग होता
*सायन्स कॉलेजमध्ये एक दिवसीय युवती स्वसंरक्षण कार्यशाळा संपन्न*
• Global Marathwada

addComments
टिप्पणी पोस्ट करा