उस्माननगर (वार्ताहर) दि. १२ मार्च...
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गावात शानदार पुतळा उभारावा असा तरुण मावळ्यांचा खुपदिवसाचा संकल्प होता . दरवर्षी दि.१० मार्च रोजी मोठीलाठी ता.कंधार येथे शिवरायांची जयंती संपन्न होते. हे वर्ष छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे ,या शुभमुहूर्तावर दि.१०मार्च रविवारी सकाळी ९ वाजता दत्तसंस्थान मोठीलाठी चे मठाधिपती गुरु अवधुतबन महाराज यांचे शुभहस्ते छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे बसस्टँड परिसरात अनावरण करण्यात आले. गावातील सर्व जाती पंथातील ५१ जोडप्यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला विधीवत मत्रांच्या जयघोषात पंचमृत अभिषेक करण्यात आला.. यज्ञेश्वरमहाज जोशी यांच्या अधिपत्याखाली शिवहार महाराज मठपती, चंद्रकांत महाराज जोशी, दुर्गादास महारज जोशी,गजानन महाराज जोशी यांनी विधीवत अभिषेक संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवराय च्या घोषणांनी, फटाक्यांची आतिषबाजी परिसर दुमदुमला, गावातील मुख्य मार्गाने कलशधारी जोडपे,भजनी मंडळी, शिवाजी महाराजांचा जयघोषात छत्रपतींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या निमीत्ताने रक्तदान शिबीर घेण्यात आले यामधे महिलांनी मोठ्याप्रमाणात रक्तदान केले, त्याबरोबर महाप्रसादाचे आयोजन व रात्री ही.भ.प बेटकर महाराज यांचे शिवचरित्रावर किर्तन झाले. हा ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावतील सर्व तरुण, जेष्ठ नागरिक, महिलावर्ग सर्वांनी मोठा सहभाग घेतला होता.

addComments
टिप्पणी पोस्ट करा