नुसितर्फे वसईत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा*




नॅशनल युनियन सिफेअरर्स ऑफ इंडियाच्या वतीने वसईत

आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

न्यूसीच्या महिला विभागातर्फे ९ मार्च २०२४ रोजी वसईत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. नुसिचे जनरल सेक्रेटरी श्री. मिलिंद कांदळगावकर व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेन्ट, होळी येथे गरीब, अनाथ व दिव्यांग मुलींसोबत साजरा केला, त्यांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ व नृत्य सादर करण्यात आली. महिला विभागाच्या सभासदांनी त्यांना अन्नधान्य व विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्युसिची वसई टीम व महिला विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या