नांदेड दि ३/२/२४महाराष्ट्र राज्य सरकार हे ५०खोके चे म्हणून प्रसिद्ध आहे,हे शिंदे व फडणवीस यांचे सरकार हे हुकुमशाही चे समर्थन करत आहे यांच्या नेतृत्वाखाली सरकार च्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था ही पेपर लिक असो की गुंडगिरी व भ्रष्टाचार असो या कारणांमुळे पुर्णपणे ढासळलेली आहे हे थांबविण्यासाठी हे जुलमी सरकार अपयशी ठरले आहे.अलीकडे उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार यांनी पोलिस ठाण्यात केलेला गोळीबार हे गुंडगिरी चे अधिकृत उदाहरण आहे यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे.यास शिंदे फडणवीस सरकार हे खतपाणी घालत असुन त्यास सरकार चे अभय आहे यामुळे राज्यातील लोक घाबरले आहेत या साठी आम आदमी पार्टीच्या वतीने १) अकार्यक्षम राज्याचे ग्रहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पदावरून हटवावे २) कायदा व सुव्यवस्था चा भंग करणाऱ्या व गुंडगिरी चे समर्थन करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करा. ३) भाजप नेते व आमदार यांची गुंडगिरी थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी इत्यादी मागणी चे निवेदन मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना आम आदमी पार्टीच्या नांदेड जिल्हा च्या वतीने देण्यात आले या वेळी अँड जगजीवन भेदे, ,प्रा देविदास शिंदे सुभाष कठारे, अदील जहागिरदार संदीप राठोड अँड.एस आर थोरात अँड दिलीप गंगातीर, अँड बाबु गावंडे अँड रामेश्वर साबळे, अँड संतोष रावनगावे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा