नांदेड : शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या कार्याध्यक्षपदी मराठवाड्यातील अभ्यासू लढाऊ शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष सचिव संजय मोरे खासदार हेमंत पाटील, उपनेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव ही नियुक्तीपत्र बाळासाहेब भवन मुंबई येथे दिले.
पत्रकारितेपासून सामाजिक कार्याची सुरुवात करणारे प्रल्हाद इंगोले यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यांनी न्यायालयात उभा केलेला एफ आर पी चा लढा राज्यभर गाजला. कारखानदारांना सळो की पळो करून सोडणाऱ्या इंगोले यांच्या याचिकामुळे कारखानदारांना कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागले. महाराष्ट्राच्या ऊसदर नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून काम करताना कारखानदाराच्या अनेक चोऱ्या बंद केल्याने त्यांचे काम लक्षवेधी ठरले. विज,पाणी, पीक विमा,बँकाच्या कर्जाचे प्रकरण अशा विविध प्रश्नात इंगोले यांनी सातत्याने विविध आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. गेल्या काही वर्षापासून ते खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत शिवसेनेत कार्यरत होते. शिवसेना फुटी नंतर ते शिंदे गटात सहभागी झाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामाची दखल घेत शेतकरी सेनेच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शिवसेना सचिव संजय मोरे,खासदार हेमंत पाटील, उपनेते तथा मराठवाडा संपर्क नेते आनंदराव जाधव यांनी बाळासाहेब भवन मुंबई येथे सदर नियुक्तीपत्र दिले त्यांच्या या निवडीमुळे शिवसेना पक्ष वाढीसाठी व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी या निवडीचा निश्चित शेतकऱ्यांना लाभ होईल असा विश्वास

addComments
टिप्पणी पोस्ट करा