नांदेड विभागातील विविध वनपरिक्षेत्रांतर्गत अनेक अनियमित्ता व गैरकारभाराच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्ते आनंदा राजेमोड यांनी किनवट मांडवी बोधडी इस्लापूर भोकर येथील भ्रष्टाचारी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे सहाय्यक वनसंरक्षक गिरी उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या कारभाराची चौकशी करावी यासाठी आंदोलन सुरू केला आहे नाांदेड विभागातील विविध योजना अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या निधीचा विनियोग करण्यासाठी जबाबदारी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची आहे परंतु संबंधित वनपरिक्षेत्राधिकार्याने स्वतःचा आर्थिक लाभ होण्याच्या हेतूने कामांना नियमांना बगल देऊन मजुराएवजी यंत्राच्या साह्याने कामे उरकून घेतली आहेत ही कामे करत असताना देखील अनेक कामे ही कागदोपत्री दाखवून कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आनंदा राजेमोड यांनी केला आहे नांदेड वन विभागातील किनवट मांडवी बोधडी इस्लापूर भोकर या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मुख्यत्वे करून मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर करून योजनांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप राजेमोड यांनी केला आहे परंतु तरीदेखील संबंधित सहाय्यक वनसंरक्षक गिरी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी असलेले उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी त्यांच्या कामांना संरक्षण देत भ्रष्टाचाराला अभय दिले असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते आनंदा राजेमोड यांनी दिनांक 12 फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केला आहे मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला जिल्हा प्रशासन व वन विभागाकडून कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने उपोषणार्थी आनंदा राजेमोड यांनी संबंधितावर विभागीय चौकशी नेमण्यासाठी आंदोलनाला तीव्र करण्याकरता मुख्य वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
 भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या चौकशीची मागणी नांदेड 
 • Global Marathwada

 
 
 
 
 
addComments
टिप्पणी पोस्ट करा