नदंगिरी किल्ला परिसरात होत असलेल्या महासंस्कृती कार्यक्रमात सर्व धर्मीय संस्कृतीचा समावेश करून घ्यावा- फारुख अहमद

 


नांदेड,प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त होत असलेल्या महासंस्कृती महोत्सवात सर्व धर्मीय संस्कृतीचा समावेश व्हावा.

या कार्यक्रमांतर्गत होत असलेल्या विविध उपक्रमात सर्व धर्मीय युवकांचा स्वयंसेवक म्हणून समावेश करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी केले आहे.

नांदेड शहरात होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व धर्मीय संस्कृतीचा समावेश होताना दिसत नसून जाणीवपूर्वक बौध्द संस्कृती व मुस्लिम संस्कृती असलेले सांस्कृतिक कार्यक्रमाना बगल देण्यात आली आहे. यादरम्यान अनेक कार्यक्रमात कार्यकर्ते तसेच स्वंयसेवक यांचा सहभाग करून घेण्यात येत आहे. महोत्सवादरम्यान होत असलेल्या विविध कार्यक्रमात विविध जाती धर्मातील तरुणांचा सहभाग करून घेतल्यास व त्या त्या धर्माच्या सांस्कृतिक परंपरेचा समावेश करून घेतल्यास हा महोत्सव आणखीनच ऐतिहासिक व सामाजिक एकतेचा संदेश देणारा व छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या विचारांचा ठरेल.असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे गड किल्ल्याच्या संवर्धन कार्यक्रमात सर्व धर्मीय तरुणांचा समाविष्ट करून घ्यावा नांदेडमध्ये नंदगिरी किल्ल्याच्या परिसरात अनेक मुस्लिम कार्यकर्ते व तरुण सामाजिक भावनेने काम करणारे कार्यकर्ते असून त्यांचा या उपक्रमात सहभाग करून घ्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी जिल्हा महासचिव शाम कांबळे महानगर अध्यक्ष (दक्षिण) विठ्ठल गायकवाड, महानगर अध्यक्ष (उत्तर) आयुब खान पठाण, महासचिव अमृत नरंगलकर , महानगर प्रवक्ता उबेद बा-हुसेन, प्रबुद्ध भारत वितरण प्रतिनिधी सुनील सोनसले, साहेबराव भंडारे, केशव कांबळे, युवा सामाजिक कार्यकर्ता सय्यद शहरुख हाशमी,अझहर खान आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या