- नांदेड
गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्ष सोडून गेले पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षात आहेत यामुळे पक्षाला फार काही फरक पडणार नाही असे सांगत आम्ही आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस जिंकेल असा दावा नांदेडचे निरीक्षक तथा मराठवाडा प्रभारी शिवाजी मोघे यांनी केला जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 20 रोजी नवामोंढा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील नांदेड निरीक्षक माजी खासदार सचिव मुजाहिद इकबाल खान जिल्हा समन्वयक माजी आमदार ईश्वर भोसीकर प्रवक्ता मुंथनजीप यांची उपस्थिती होती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत नुकताच भाजपात प्रवेश केला आहे यामुळे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसला खिंडार पडले आहे सध्या त्यांच्यासोबत अन्य आमदार तता पदाधिकारी जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसकडून हे डॅमेज होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत काँग्रेस निरीक्षकांची बैठक वीस रोजी पार पडली या बैठकीत काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी मराठवाडा प्रभारी मोघे यांनी विविध प्रश्नांची उकल केली भाजपाने अशोकराव चव्हाण यांना पळवला आहे असाच प्रकार देशभरात केला जात आहे भाजपाची फोडाफोडीची ही नीती लोकशाहीला कलंक आहे अशोक चव्हाण भाजपात गेल्याने पक्ष मजबुतीसाठी लवकरच संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत चव्हाण जरी पक्ष सोडून गेले तरी पदाधिकारी कार्यकर्ते पक्षात आहेत लोक सोबत आहेत नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल समितीकडून संघटने कडे सादर केला जाईल तर यापुढे चव्हाण यांच्यासोबत एक दोन कार्यकर्ते जातील याने पक्षाला फरक पडणार नाही नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हीच जिंकू असा दावा मोघे यांनी यावेळी केला
जिल्हाध्यक्षपदी बी आर कदम तर शहराध्यक्षपदी सत्तारांची वर्णी लागण्याची शक्यता??
गेल्या अनेक महिन्यापासून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी काँग्रेसच्या बैठकीला जाणे सोडले होते परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करताच बी आर कदम यांनी आवर्जून बैठकीला हजेरी लावली राहुल गांधीचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून बी आर कदम यांची ओळख आहे त्यामुळे पुन्हा एकदा बिहार कदम यांना जिल्हाध्यक्षपदी बसवण्याची शक्यता वर्तवली जात असून माजी महापौर अब्दुल सत्तार यांची शहराध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे शंकरराव चव्हाण यांच्या काळात मोहम्मद सलीम यांनी शहराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर मुस्लिम प्रतिनिधीला शहराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी प्राप्त होणार आहे शहराध्यक्ष पदासाठी सुरेंद्र घोडसकर बालाजी चव्हाण मुतंजीब हे स्पर्धेत असल्याचं कळते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागिलीकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे बि आर कदम यांची वर्णी लागन्याची दाट शक्यता आहे

addComments
टिप्पणी पोस्ट करा