*मराठा आरक्षणाच्या मागणीची पूर्तताः अशोक चव्हाण*

 

राज्यसभेचे नवनिर्वाचित भाजप खासदार अशोकराव चव्हाण, मेधाताई कुलकर्णी व डॉ. अजित गोपछडे यांचा आज भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार व नेते उपस्थित होते.

मुंबई, दि. २० फेब्रुवारी २०२४: 

मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यासंदर्भात विधेयक मंजूर करून महायुती सरकारने सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची पूर्तता केल्याचे माजी मुख्यमंत्री व नवनिर्वाचित भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण केली. कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेवरील हरकतींची समिक्षा केल्यानंतर त्याबाबतही निर्णय घेण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले असून, या निर्णयाबद्दल त्यांनी सकल मराठा समाज व महायुती सरकारचे अभिनंदन केले.

टिप्पण्या