छत्रपती शिवाजी महाराजांनी जनसामान्यांच्या हितासाठी क्रांती केली डाँ .राजा कदम

 नांदेड:( दि.२० फेब्रुवारी २०२४)   छत्रपती शिवाजी महाराजांकडून नेतृत्वाचे गुण देशानेच नाही तर संपूर्ण जगाने घेतले आहेत. रयतेचे राजे ही छत्रप...

 नांदेड:( दि.२० फेब्रुवारी २०२४)   छत्रपती शिवाजी महाराजांकडून नेतृत्वाचे गुण देशानेच नाही तर संपूर्ण जगाने घेतले आहेत. रयतेचे राजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी संपूर्ण राज्य आणि प्रशासन व्यवस्था राबविली. जाती आणि धर्मामध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी कायदा व सुव्यवस्था काटेकोर जपणारे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनसामान्यांच्या हितासाठी क्रांती केली, असे प्रतिपादन वसमत येथील सुप्रसिद्ध वक्ते ॲड.राजा कदम यांनी केले. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.याप्रसंगी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, समन्वयक डॉ.संदीप पाईकराव, सूत्रसंचालक डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

   अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिले; इतकेच नाही तर राष्ट्रमाता जिजाऊंना त्यांनी सती जाऊ दिले नाही. राष्ट्रमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. छत्रपती शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या विरोधात होते. ते विज्ञानवादी राजे होते. त्यांच्या सर्व मोहिमा अमावस्येला निघत असत, तसेच ते पर्यावरणाचे रक्षण करणारे राजे होते. झाडांची लागवड व संवर्धन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता, असे विचार व्यक्त केले.  पुढे बोलताना ॲड. राजा कदम म्हणाले की, महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य समोर ठेवून संविधानाची रचना केली, असे संविधान सभेत सांगितले. संविधानामध्ये स्वराज्याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बजावलेल्या कर्तृत्वाची आणि क्रांतीची फळे आपण आजही चाखत आहोत.प्रारंभी प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड यांनी मानले. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव,कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रा.गौतम दुथडे, डॉ.रत्नमाला मस्के, प्रा.एस.एस.मावसकर, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रशांत मुंगल, श्री.डाकोरे आदींनी सहकार्य केले.

याप्रसंगी प्रा.कैलास दाड, डॉ. कविता केंद्रे, डॉ. नीताराणी जयस्वाल, प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ.एस.एम. दुर्राणी, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.पी.पी. सिसोदिया, प्रा.एस.एस.वाकोडे, प्रा संगीता मसारे, प्रा.संगीता चाटी, डॉ.अजय टेंगसे, डॉ. प्रवीण मिरकुटे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. संजय ननवरे, डॉ.विश्वाधार देशमुख, प्रा.माधव दुधाटे, डॉ.कैलास इंगोले, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ.अजय मुठे, डॉ.मोहम्मद आमेर, डॉ.ए.एस. कुवर, डॉ.साईनाथ शाहू आदी प्राध्यापकांसह विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel