शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सानपाडा विभागाच्या वतीने २० फेब्रुवारी २०२४ रोजी हुतात्मा बाबू गेनू मैदान, सेक्टर ८, सानपाडा येथे हळदी कुंकू समारंभ, अपंग बांधवांसाठी भव्य रोजगार मेळावा आणि स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रेड्डीज फाऊंडेशन माध्यमातून १८० उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला. विभागातील दोन हजार पेक्षा जास्त माता भगिनिंंनी हळदी कुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला. सानपाडा सेक्टर निहाय लकी ड्रॉ मध्ये २४ भगिनी पैठणी विजेत्या ठरल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व धुमधडाक्यात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक सौ. रंजनाताई शिंत्रे, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, माजी नगरसेविका सौ. नंदिनीताई, राजन विचारे, अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष श्री. नारायण शेठ भोर तसेच सानपाडाचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले, महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर, शहर संघटक सौ साधना वास्कर, उपशहर प्रमुख सुनील गव्हाणे, शिवसेना शाखाप्रमुख ७९ चे बाबाजी इंदोरे, उपविभाग संघटक सौ. साधना इंदोरे व इतर मान्यवरांचे मोलाचे योगदान लाभले, शिवसेना सानपाडा विभाग आणि महिला आघाडी या सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला.
आपला
मारुती विश्वासराव


addComments
टिप्पणी पोस्ट करा