सायन्स कॉलेज नांदेड येथे राज्यस्तरीय टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद*


नांदेड प्रतिनिधी दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडचे अध्यक्ष मा. डॉ. व्यंकटेश जी काब्दे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी मा. दिलीप बनसोडे, कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी यु गवई, कार्यक्रमाचे समन्वयक उपप्रचार्य प्रो डॉ एल पी शिंदे, उपप्राचार्य प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला, सहसमन्वयक डॉ आर ए मुनेश्वर, सहसमन्वयक डॉ पी डी सातव व प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य प्रा ई एम खिल्लारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती .कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रो डॉ एल पी शिंदे यांनी केले. कार्यशाळेत विविध स्तरावरून विद्यार्थी वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करून दरवर्षी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. जास्तीत जास्त नवनिर्मितीची कल्पना युवाशक्ती मध्ये असते. असे प्राचार्य डॉ डी यु गवई यांनी मार्गदर्शन करताना विचार मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिलीप बनसोडे यांनी बोलतांना प्लास्टिक वापरामुळे कॅन्सर सारखे रोग होतात,कोणत्याही वस्तूचे वापर बारकाईने केले तर निसर्गाचे संवर्धन होईल. प्लास्टिकचे डी कंपोज करावे तुम्ही पुढे भावी शास्त्रज्ञ होणार आहात. असे मत प्रस्तुत केले. अध्यक्षीय समारोप करतांना डॉ वेंकटेश जी काब्दे यांनी विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांत विविध कल्पकता आहेत, त्यांच्या माध्यमातून विविध निर्मिती विद्यार्थी करू शकतात. पाण्याचा योग्य रीत्या वापर करण्यासाठी नवनिर्मितीची आवश्यकता आहे, हे आजचे युवा करून दाखवू शकतात. त्यांच्या कल्पनाशक्तीची उंच भरारी आहे असे मत प्रस्तुत केले. या राज्यस्तरीय कार्यशाळेत शंभर हुन अधिक संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी जोंधळे, तमन्ना गर्ग यांनी केले व आभार प्रदर्शन संदीप सूर्यवंशी ने केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात विशेष उपस्थितीत प्रा एम आर मुळे, प्रो डॉ एस बनसोडे, प्रा डॉ डी आर मुंडे,

डॉ व्ही बी चव्हाण, प्रा श्रीकांत दुलेवाड, प्रा अविनाश घाडगे, प्रा एस एम कदम, प्रा कपिल धूत मल, प्रा आर एम आचेगावे ,

प्रा एस पी चव्हाण, प्रा सीमा शिंदे यांची उपस्थिती होती. तसेच परीक्षक म्हणून डॉ प्रीता बोरकर, प्रा माया राऊत यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभात कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ डी यु गवई तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त मा. रमेश चावरे आणि दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे रसायनशास्त्र विभागाचे डॉ भास्कर दवणे, तसेच प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला, प्रा ई एम खिल्लारे, प्रा एम आर मुळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ भास्कर दवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु निर्मितीसाठी केलेले प्रयोग नावीन्यपूर्ण आहेत, महानगरपालिकेने याची दखल घ्यावी. मा. रमेश चावरे यांनी बोलताना म्हणाले सायन्स महाविद्यालयात सातत्याने अशा कार्यक्रमाचे आयोजन होत असतात हे स्तुत्यपूर्ण असे आयोजन आहे अशा कार्यशाळेचे स्वरूप मोठ्या प्रमाणात असले पाहिजे. बक्षीस वितरण समारंभात रुपये दोन हजार, दिड हजार, एक हजार असे बक्षीसाचे स्वरूप होते. शाळा मधून भाग घेणाऱ्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रथमेश कहाळेकर शिवाजी हायस्कूल नांदेड तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आरोप ऐगावकर ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल नांदेड व तृतीय क्रमांक बक्षीस आर्य आवटे होलीक्रास स्कूल नांदेड यांनी पटकावले. महाविद्यालयांतून भाग घेणाऱ्या मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस शुभांगी मिटकरे, यशवंत महाविद्यालय नांदेड, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तमन्ना गर्ग सायन्स कॉलेज नांदेड, तृतीय क्रमांकाचे बक्षीस वैशाली पवार यशवंत महाविद्यालय नांदेड ने पटकावले. प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या