सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप


 नांदेड वार्ताहर दिनांक 22 सायन्स कॉलेज नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वडेपुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील अन्नपूर्णा माता मंदिर परिसर येथे दिनांक 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधी दरम्यान आयोजित केलेल्या सात दिवसीय विशेष वार्षिक शिबिर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास शिबिराचा समारोप दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला. सर्वप्रथम पूर्ण माता मंदिर परिसर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली झाडांना आळे करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या समारोप समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई आणि प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक मा डॉ मल्लिकार्जुन करजगी हे होते. शिबिरातील विद्यार्थ्यांना उदबोधन करताना रासेयो चे भीष्म पितामह डॉ डी डी पवार आमचे गुरु व त्यांचे शिष्य म्हणून आम्ही या ठिकाणी बोलतो. महाराष्ट्र पुरोगामी राज्य या राज्यात होणारे बालविवाह यास प्रतिबंध लावण्यासाठी गावागावांत जाऊन किंवा आपल्या गावात तुम्ही एक जरी बालविवाह रोखला तर रासीयो द्वारे सायन्स महाविद्यालयाचे खरे यश आहे. तसेच रस्ते सुरक्षेचे नियम पाळून उपयोगात आणावे व स्वतः अठरा वर्षावरील नव मतदार म्हणून नाव नोंदणी करून इतरांना नोंदणी करण्यास प्रवृत्त करावे या महाविद्यालयातील एक जरी पोपट पवार व एक जरी सिंधुताई सपकाळ झाली तर महाविद्यालयाचे खरे यश आहे. असे उद्बोधन केले. दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ बालाजी कोम्पलवार यांनी गांधी विचारांची प्रसंगीकता वर वक्तव्य प्रस्तुत करून शंभरहून अधिक गांधीजींच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी लावून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. ग्रामस्थ नागरिक देवीदास दळवे, विद्यार्थ्यांमध्ये राखी जोंधळे, प्रफुल्ल इंगोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गोविंद कंठाळे ने शिबिराचा संक्षिप्त अहवाल वाचन केले. रक्तदान केलेले रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ डी यु गवई यांनी अध्यक्षीय समारोप केला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ एल पी शिंदे, उपप्राचार्य प्रा ई एम खिल्लारे, डॉ अश्विन बोरीकर, प्रा अविनाश घाडगे, डॉ आर ए मुनेश्वर, वड़ेपूरी ग्राम पंचायत सेवक श्री कपिल बोडके, श्री पांडुरंग तोरणे, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, स्वयंसेवक, स्वयंसेविका इतर मान्यवर शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजिका महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन केले आणि प्रा श्रीकांत दुलेवाड यांनी आभार प्रदर्शन केले. दुसऱ्या दिवशी परत गावकऱ्यांची संवाद साधून सर्व शिबिरार्थींनी आपल्या गावी परतीचा प्रवास केला


टिप्पण्या