नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची नंदगिरी किल्ल्यातील प्रदर्शनास अभ्यास भेट.


सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून नांदेड जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ, जीवनशैली, निसर्ग ,स्थापत्य, कला ,पर्यटन इत्यादी बाबींवर छायाचित्र प्रदर्शन दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड येथील नंदगिरी किल्ल्यावर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक मा.श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींची उपस्थिती होती. याचा भाग म्हणून नांदेड मधील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या कला शाखेतील इतिहास विभागातील जवळपास 35 विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शनातील ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. यावेळी श्री सुरेश जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक छायाचित्राचे विस्तृतपणे महत्त्व सांगितले. त्याचबरोबर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. संतोष कोटूरवार व प्रा.डॉ. अश्विनी खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर सर व उपप्राचार्या प्रा.डॉ कल्पना कदम मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या