नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ६ जानेवारी २०२४ रोजी केमिस्ट भवन येथे १४ वा मराठा समाजाचा वधु- वर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी सानपाडा येथील नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुनीलशेठ छाजेड व अध्यक्ष राकेशशेठ नलावडे, नगरसेवक सोमनाथ वासकर, दशरथ भगत, समाजसेवक भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, मिलिंद सूर्याराव, आबा उर्फ दशरथ जगताप, पांडुरंग आमले, बाबाजी इंदोरे, शंकरशेठ माटे, विसाजी लोके, मंगेश आमले, नंदा डेरे, सुभाषशेठ थोरात, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, उद्योगपती बाळासाहेब विचारे, शांताराम घुले आदी मान्यवरांनी आर्थिक सहकार्य करून वधूवरांना व पालकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जुन्नर आंबेगाव रहिवासी संघटनेचे सुरेश डुंबरे, ऑडिटर श्रीकांत चव्हाण, शिवनेरीची श्रीमंती या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक संजय नलावडे, कोरडे, पत्रकार रवींद्र आवटी, भीमाशंकर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे पानसरे, बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचे संचालक वसंत गावडे, विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे संचालक विष्णू शेठ सोनवणे, गणेश पावगे, यशोदीप सहकारी पतसंस्थेचे संचालक सुरेश सोनवणे, शैला सोनवणे, बाळासाहेब मुटके, बबन (दादा) हाडवळे, शांताराम सोनवणे , डी .जी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी बाळासाहेब नलावडे, बबन भालेराव, जालिंदर भोर, किरण नलावडे, विष्णुदास मुखेकर, ज्ञानेश्वर जाधव, मारुती विश्वासराव, शिवाजी पाटील, कृष्णा ऊतेकर, कोंडीबा पाबळे, धोंडीराम बोरचटे, अरुण रोडे पाटील, कांताराम जाधव, देवराम भोर, बाळकृष्ण लोहोटे कर्मचारी दिपाली पाटील विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यात जवळजवळ ४०० ते ४५० वधू - वर व पालक उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा