हदगाव:(प्रतिनिधी संदीप गिरी)
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कडून हदगाव येथे नमो चषक २०२४ विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साईराज पाटील साखरे यांनी केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ मिळावे व सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्याकडून नमो चषक स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत क्रिकेट,कबड्डी,खो-खो,व्हालीबॉल,फुटबॉल,बुद्धिबळ,रागोळी,धावणे इत्यादी प्रकारच्या अनेक खेळांचा समावेश आहे.
तरी सर्व खेळाडूंनी यात सहभाग घेऊन नमो चषक २०२४ चे मानकरी होण्यासाठी दि.१२जानेवारी २०२४ पर्यंत नाव नोदणी करून सहभागी व्हावे.असे आव्हान युवा मोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साई पाटील साखरे यांनी केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा