*पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन) उत्साहात संपन्न*


नांदेड - येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला. शाळेच्या प्राचार्या डॉ मालिनी सेन , उपप्राचार्य श्री अजय फरांदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थीनींनी प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी महिलांचे पोशाख परिधान करून महिला आणि मुली या पुरुषांपेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले.

यावेळी बोलताना शाळेचे उपप्राचार्य अजय फरांदे यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य आणि समाजकार्य याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही प्रसंग त्यांनी सांगितले. शाळेच्या प्राचार्या डॉ मालिनी सेन यांनी यावेळी बोलताना सावित्रीबाई फुले यांच्या अनमोल कार्यामुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे आज २१ व्या शतकात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींचा सामना करून महिलांना शिक्षणाची दारे खुली केली , अनेक समाज विघातक चालीरितींना विरोध करून महिलांचे आयुष्य सुखी करताना स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आज त्यांच्यामुळे मुली आणि महिला समाजात अभिमानाने वावरत असून जगभरात भारताचे नाव करत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी इयत्ता १० वी मधील विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य सामूहिक गीतातून सादर केले.

यावेळी शाळेचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री राजू रेड्डी , गोविंदसाई मखवाना , समन्वयक जगन्नाथ ढेरे, रीना नायर, मीनाक्षी अय्यर, कार्यक्रम समन्वयक गुरूदीप सिंग , तसेच शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या