मुंबई दि.४: मुंबईतील गिरण्यांचा इतिहास जतन करणारे, काळाचौकी येथील बंद इंदू मिल क्र.२/३ च्या जागेवर उभे राहाणारे "टेक्स्टाइल म्युझियमचे"थांबलेले बांधकाम त्वरित सुरू करा अन्यथा गिरणी कामगार येथे बेमुदत उपोषणाला बसतील,असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे निदर्शने आंदोलनात बोलताना दिला.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या पुढाकाराने इंदू मिल क्र.२/३च्या जागेवर "वस्त्रोद्योग संग्रहालय"उभे रहात आहे.मुंबई महानगर पालिकेच्या वतीने गेली दोन वर्षे काम चालू होते.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी या स्थळाला भेट देऊन,गिरण्यांचा स्फूर्तिदायक इतिहास जतन करणारे हे टेक्स्टाइल म्युझियम आंतरराष्ट्रीय स्तरावरावरचे व्हावे,अशी मागणी केली होती.परंतु अचानकच गेली सहा महिने बांधकाम बंद आहे. ते त्वरित चालू करावे या मागणीसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गिरणगावात आज काळाचौकी येथे जोरदार निदर्शने छेडण्यात आली. गोविंदराव मोहिते त्या वेळी कामगारांपुढे बोलतांना आपल्या भाषणात पुढे म्हणा ले,सरकारने आता अधिक वेळ न काढता हे ऐतिहा सिक काम पूर्णत्वाला न्यावे! टेक्स्टाइल म्युझियम पूर्ण झाल्यावर उर्वरित जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्यात यावी,असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.
खजिनदार निवृत्ती देसाई यांनी या वस्त्रोद्योग संग्रहालयात कामगारांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य दिले पाहिजे,अशी मागणी केली.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या घर योजनेचा आढावा घेतला.उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी.बी.गावडे यांनी आपल्या भाषणात सांगितले, गिरण्यांचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा दायक ठरेल. मुंबई महानगर पालिकेच्या वतीने साकारल्या जाणा-या या प्रकल्पाअंतर्गत "कहाणी गिरणगावाची' ही चित्रफीत तयार करण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वी या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती.कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांचे तत्कालीन कामगार चळवळीचे कार्य येणाऱ्या पिढीला ज्ञात व्हावे यासाठी स्वतंत्र दालन ठेवण्यात येणार आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा