भारत सरकारच्या दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण मंडळावर सुधाकर अपराज यांची फेरनिवड*

भारत सरकारच्या केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखालील दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून १२ जानेवारी २०२४ च्या आदेशानुसार ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन (वर्कर्स) व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी कामगार विश्वस्त, हिंद मजदूर सभेचे कार्यकारणी सदस्य श्री. सुधाकर अपराज यांची हिंद मजदूर सभेच्या शिफारशीनुसार फेरनिवड झाली आहे.

संपूर्ण देशात या मंडळाची एकूण ५८ प्रादेशिक संचालनलये कार्यरत आहेत. या सर्व प्रादेशिक संचालनामधून कामगारांना विविध प्रकारचे कामगार प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असते. या सर्व देशव्यापी कारभारावर जी समिती नियंत्रण ठेवते. त्याच केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय समितीवर हिंद मजदूर सभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुधाकर अपराज यांची तीन वर्षासाठी फेरनिवड झालेली आहे. त्यांनी या अगोदरच्या प्रशासकीय समितीवर अतिशय अभ्यासपूर्ण काम करून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा खास वेगळा असा ठसा उमटविला होता. त्यामुळेच ते मंडळाच्या सर्वच अधिकारी व सदस्यामध्ये तसेच कामगारांमध्ये लोकप्रिय आहेत. याचीच परिणती म्हणून पुन्हा तीन वर्षासाठी त्यांची प्रशासकीय समितीवर सदस्यपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे. त्यामुळे गोदी कामगारांसह सर्वच कामगार वर्गात व समाजात सुधाकर अपराज यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 आपला 

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या