*'यशवंत ' मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन*


 नांदेड:( दि.१२ जानेवारी २०२४)

           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रमाता राजमाता मां जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

           याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, डॉ.श्रीकांत जाधव,डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ.अजय गव्हाणे, आनंदा शिंदे, पोशट्टी अवधूतवार, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव आदींनी अभिवादन केले.

टिप्पण्या