स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त गीता परिवारच्यावतीने वेषभूषा व वक्तृत्व स्पर्धा

 


नांदेड, दि. १३ (प्रतिनिधी)-

गीता परिवार नांदेड़ च्या वतीने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता

जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्त

वेशभूषा व व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी मुलांनी स्वामी विवेकानंद व जिजाऊ मातावेशभूषा परिधान करुन त्यांचे

थोर विचार वक्तृत्व स्पर्धतुन प्रगट केले विजेत्या मुलांना

पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शशिमोहन नंदा हे होते तर प्रमुख

पाहुणे गीता परिवार मराठवाडाचेकार्यध्यक्ष गंगाबिशन कांकर,

अँड .सी. बी. दागड़ीया,सुरेश मंत्री, हे होते. प्रकल्प प्रमुख अमरीश तिवारी यांनी स्पर्धेचे नियोजन केले. यावेळी

गीता परिवारच्या अध्यक्षा किरण मंत्री, सचिव मीना कांकर,

सुशिला मुंदड़ा माला शर्मा, डॉ.उर्मिला मालू, वैदेही तिवारी

आदि सदस्य उपस्थित होते.



टिप्पण्या