महिंद्रा ऍन्ड महिंद्राच्या कामगारांना यंदा कमाल‌ दीड लाख रुपये बोनस, कामगार नेते सचिन अहिर यांचे‌ मोलाचे‌ सहकार्य!*


    मुंबई दि.२: आंतर राष्ट्रीय वाहन ऊद्योगातील अग्रणी महिंद्रा ऍन्ड महिंद्रा कंपनीतील १२००० पेक्षा अधिक कामगारांना दोन पी.एफ. बेस.पगार अधिक १९,५०१ रुपये असे मिळून बोनसपोटी वरील प्रमाणे भरीव रक्कम मिळणार आहेत. 

    २०२२-२३ या वर्षाच्या बोनससाठी कंपनी आणि महिंद्रा एम्लॅाईज फोडरेशन यांच्या मध्यें नुकत्याच वाटाघाटी होऊन वरील प्रमाणे बोनसचा भरीव करार संपन्न झाला.बोनस रक्कम कागारांना ६ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी पूर्वी मिळणार आहे.त्यामुळे सर्व युनिटच्या कामगारांमध्ये ऊत्साहाचे वातावरण पसरले आहे.या भरीव बोनस वाटाघाटीच्या यशात लोकप्रिय कामगार नेते आमदार

 सचिनभाऊ अहिर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.या फेडरेशन मध्ये ऑटोसेक्टर कांदिवली,नाशिक, ईगतपुरी, हरिद्वार व फार्म सेक्टर कांदिवली आणि नागपूर‌ इत्यादी युनिटचा समावेश होतो.••••



टिप्पण्या