राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा *मुंबईच्या टी एस टी टी ए संघाचे वर्चस्व*

 


परभणी  ‌

५४ व्या आंतर जिल्हा व ८५ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला गटात अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. मुंबईच्या टीएसटी संघाच्या खेळाडूंनी सहा गटात विजेतेपद पटकावित वर्चस्व गाजविले‌

शिवछत्रपती क्रीडा नगरीतील वेटलिफ्टिंग सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुषांच्या अंतिम लढतीत अकरावा मानांकित खेळाडू रीगान (टी एस टी टी ए) याने चौथा मानांकित खेळाडू सिद्धेश पांडे (ठाणे) याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीने झालेला हा सामना त्याने ११-४,९-११,५-११, ६-११,११-९,११-९, ११-८ असा जिंकला. महिलांच्या अंतिम लढतीत नागपूरच्या जेनिफर हिने सायली वाणी या नाशिकच्या *दहाव्या मानाकीत खेळाडूला पराभूत करत सर्वात कमी वयात स्टेट चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला* . अकरावी मानांकित जेनिफर हिने हा सामना ११-६,४-११,७-११,८-११, ११-७,११-४, ११-८ असा घेतला. यंदाच्या मौसमात अनेक स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या सायली हिला १९ वर्षाखालील गटातही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या गटात अकराव्या मानांकित तनिषा कोटेचा ( टी एस टी टी ए मुंबई) हिने तिचा ११-५,११-८, ८-११, ११-५ असा पराभव केला. मुलांच्या १९ वर्षाखालील गटात सहावा मानांकित जश मोदी( टी एस टी टी ए मुंबई) हा विजेता ठरला. त्याने अंतिम लढतील पाचव्या मानांकित कुशल चोपडा या नाशिकच्या खेळाडूला ११-७,८-११, ११-७, ११-८,११-४ असे पराभूत केले.

११ वर्षे गटात मुंबईची खेळाडू पलक झंवर विजेती ठरली. तिने अंतिम फेरीत परभणीची खेळाडू आद्या बाहेती हिला ४-११,११-५,११-६,११-७ असे हरविले.

मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात मात्र कुशल चोपडा याने विजेतेपदाची कमाई केली. अंतिम लढतीत त्याने टी एस टी टी ए मुंबईच्या शर्वेय सामंत या द्वितीय मानांकित खेळाडूवर १४-१२,११-१३, ११-६, ११-५ अशी मात करीत आपले अव्वल मानांकन सार्थ ठरविले. टी एस टी टी ए मुंबईच्या दिव्यांशी भौमिक हिने सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळवताना इशिका उमाटे या नागपूरच्या खेळाडूवर ११-५,११-७,११-५ असा एकतर्फी विजय मिळविला.

इशिका हिने पंधरा वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावित १७ वर्षाखालील गटाच्या पराभवाची भरपाई केली. तिने पंधरा वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या रिआना भुटा हिचे आव्हान ११-५,११-६,५-११, ९-११, १३-११ असे परतविले. मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात ठाण्याचा अकरावा मानांकित तनिष पेंडसे अजिंक्य पदाचा मानकरी ठरला. त्याने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित शौरेन सोमण या पुण्याच्या खेळाडूचा ८-११,११-४,४-११, ११-६,११-९असा पराभव केला.

तेरा वर्षाखालील मुले व मुली या गटामध्ये ठाण्याच्या नीलय पाटेकर व सानवी पुराणिक हे खेळाडू विजेतेपदाचे मानकरी ठरले. पाटेकर याने अंतिम सामन्यात टी एस टी टी ए मुंबई संघाचा खेळाडू परम भिवंडीकर याचा ११-३,११-७,७-११, ५-११,११-९ असा पराभव केला. सानवी हिने अंतिम फेरीत अग्रमानांकित नैशा रेवसकर या पुण्याच्या खेळाडूवर मात केली. चुरशीने झालेला हा सामना तिने ९-११,६-११,११-२,११-७,११-९ असा जिंकला.

मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात टी एस टी टी ए मुंबईच्या आकर्षण यादव या पाचव्या मानांकित खेळाडूने विजेतेपद मिळवताना द्वितीय मानांकित खेळाडू मोहील ठाकूर (पुणे) याचा पराभव केला हा सामना त्याने ६-११,११-४,३-११, १२-१०, ११-८ असा जिंकला. मुलींमध्ये टी एस टी टी ए   

बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे गिरीष इनामदार, माजी भारतीय टे.टे. महासंघाचे उपाध्यक्ष राजीव बोडस, माजी सचिव प्रकाश तुळपुळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रविण लुंकड, राज्य महासचिव यतीन टिपणीस, राज्य कोषाध्यक्ष संजय कडु, सौ. स्मिता बोडस, राज्यसहचिव ॲड. अशितोष पोतणीस, उपाध्यक्ष डॉ.शिवाजी सरोदे, आशिष बोडस , कार्यकारिणी सदस्य अजित गालवणकर, अशोक राऊत, गणेश माळवे, शेखर भंडारी, महेंद्र चिपळूणकर, आदी उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोडस अषलेशा यांनी केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम पुणे जिल्हा सचिव श्रीराम कोणकर, चंदर थावणी, शेख असद, अनिल बंदेल, ईश्वर कदम, सुरेंद्र देशपांडे,

टिप्पण्या