हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे

 


 लातूर (प्रतिनिधी )-हिंगोली येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर ओबीसी,भटके विमुक्त, बलुतेदार एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार यांनी सहभागी व्हावे असे आवाहन रामचंद्र बलदवा सभागृह ज्ञानेश्वर विद्यालय शाहू चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी एल्गार बैठकीत ओबीसी जन मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी आवाहन केले आहे. 


  या वेळी लक्ष्मण गायकवाड,प्रा .टि.पी.मुंडे ,चंद्रकांत बावकर, मच्छिद्र भोसले, अहमदपुरचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे, अनंत चौधरी,ओबीसी नेते अँड.गोपाळ बुरबुरे यांनीही समयोचित विचार मांडले.

या बैठकीचे निमंत्रक राजेंद्र वनारसे प्रास्ताविक केले व संयोजक हरिभाऊ गायकवाड यांनी मुख्य उद्देश विषद केला.आदिवासी नेते रामराजे आत्राम यांनी सुत्रसंचलन केले. मकबुल वलांडीकर यांनी आभार मानले.


        रामचंद्र बलदवा सभागृह ज्ञानेश्वर विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस विमुक्त भटक्यांचे युवा नेते प्रमोद गायकवाड,विकास गायकवाड, 

ओबीसी नेते लक्ष्मण पोटे, शामराव धुर्वे,सौ.सरस्वती जाधव,सुमनश्री राठोड,किरण गायकवाड,अरूण,दिपक,गणेश गायकवाड,यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.गंगाधर जाधव गुरुजी,बबन जाधव,अर्जुन कतारी,विजय जाधव,लक्षमण ईटकर,मारूती झाकणे आदीसह ओबीसी,भटके विमुक्त, बलुतेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या