विरोधक आणि सत्ताधारी एकाच व्यासपीठावर ही किमया अनिल गणाचार्य यांनी घडवली,* -सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

कॉ. गुलाबराव गणाचार्य यांनी कधीही मनभेदाचे राजकारण केले नाही. त्यामुळेच त्यांना आजही आदराचे स्थान आहे. त्याचांच वारसा घेत अनिल गणाचार्य यांन...


कॉ. गुलाबराव गणाचार्य यांनी कधीही मनभेदाचे राजकारण केले नाही. त्यामुळेच त्यांना आजही आदराचे स्थान आहे. त्याचांच वारसा घेत अनिल गणाचार्य यांनी कार्य करून आलेले अनुभव चरित्ररुपाने सादर केले आहे. यात साहित्यिक अंलकारिकपण न आणता थेट अनुभवातून किंवा प्रसंगातून ते मांडल्यामुळे वाचकांना तसेच सामाजिक, राजकीय आणि कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकाच व्यासपीठावर आणायची किमया गणाचार्य यांनी जुळवली असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. 

कॉ. गुलाबराव गणाचार्य स्मारक व धर्मादाय विश्वस्त संस्था तसेच ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने दादर पूर्व येथील योगी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या ५० व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र व कामगार नेते अनिल गणाचार्य यांच्या `मी अनिल गणाचार्य’ या ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या चरित्राचे शानदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री व राज्यपाल राम नाईक आणि सुशीलकुमार शिंदे ह्या दोन पक्षातील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया अनिल गणाचार्य ह्यांनी साधली.  

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, कामगार नेते विश्वास उटगी, महेंद्र घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी नगरसेवक उपेंद्र दोशी व सुनील गणाचार्य, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ,धनश्री धारप, मारुती विश्वासराव, अतुल बर्वे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी कामगार, समाजकारण क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये कॉ. गुलाबराव गणाचार्य अग्रस्थानी आहेत, असे सांगितले. केरमाणी चाळीत सर्वसामान्यांप्रमाणे त्यांच्यात राहून त्यांनी समाजासाठी कार्य केले. त्यांचाच वारसा अनिल गणाचार्य आणि त्यांच्या सुपुत्रांनी पुढे नेला. 'मी अनिल गणाचार्य' या पुस्तकाची निर्मिती झाली असली तर अजून बरेच कार्य त्यांच्याकडून भविष्यात होणार आहे. त्यामुळे भविष्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना त्यात अधिक अनुभव आणि प्रसंग असावेत. त्याचबरोबर इतर भारतीय भाषांमध्येही ते अनुवादीत झाले तर या कामगार चळवळींचा तसेच समाजकारणाचा इतिहास अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहचू शकेल, असेही त्यांनी सांगितले. 

कामगार नेते विश्वास उटगी यांनी कामगार वर्गाची बदललेली परिस्थिती विशद केली तसेच कामगार नेत्यांनाही पारंपारिक चळवळींपेक्षा बदलत्या परिस्थितीनुसाच कार्यकक्षा ठरवता आली पाहिजे, असे मत मांडले तसेच कॉ. गुलाबराव आणि अनिल गणाचार्य यांच्या कार्याचा नेहमीच नव्या कामगार चळवळीवर प्रभाव राहिल, असेही सांगितले. पत्रकारितेच्या निमित्ताने अनिल गणाचार्य यांच्या कामगार चळवळीचे कार्य जवळून अनुभवता आल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सांगितले तसेच त्यांच्या विविध चळवळी आणि आंदोलने ही कामगार हिताची असल्यामुळे पत्रकार म्हणून आपला सदैव त्यांना पाठिंबा राहिला होता, हेही त्यांनी नमूद केले. कामगार नेते व आमदार प्रसाद लाड यांनी अनिल गणाचार्य यांच्या विविध आस्थापनांमधील संघर्षाचा तसेच हजारो कामगारांच्या न्याय्य हक्कांविषयी केलेल्या कार्याचा आढावा घेतला तसेच विविध प्रसंगदेखील सांगितले. कामगार नेते भाई जगताप यांच्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. कामगार नेते महेंद्र घरत यांनी अनिल गणाचार्य यांच्य कामगारविषयक कार्याचा आणि चळवळीविषयी विचार व्यक्त केले. आपले मनोगत व्यक्त करताना अनिल गणाचार्य यांनी सांगितले की, आपल्या आठवणींचा उपयोग हा येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक म्हणून व्हावा, यासाठी चरित्र लिहण्याचा निर्णय घेतला तसेच यातून कामगार चळवळी, समाजकारण यांचा इतिहासदेखील त्यांना अवगत करून देण्याची भूमिका ठेवली होती. माजी नगरसेवक उपेंद्र दोशी यांनी समयोचित भाषणातून कॉ. गुलाबराव गणाचार्य तसेच अनिल गणाचार्य यांच्या समाजकारणविषयी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात बोलताना सुनिल गणाचार्य यांनी कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्याविषयी तसेच पुस्तकाविषयी माहिती दिली. ग्रंथालीच्या वतीने या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका सुदेश हिंगलासपूरकर यांनी सांगितले तसेच ग्रंथालीच्या ५० व्या वर्षात हा योग जुळून आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली अनिल गणाचार्य-बरुआ यांनी केले.

आपला 

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel