आदिलाबाद विधानसभा प्रभारीपदी माजी नगरसेवक मुन्ना अब्बास

नांदेड,दि.5 :देशातील पाच राज्यांमध्ये सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.  यामध्ये तेलंगणा राज्याच्या समावेश असून या राज्यातील आदिलाबाद विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्ष निवडणूक  प्रभारीपदी युवक काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मुन्ना अब्बास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पाच राज्यात  होणाऱ्या 679 विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक प्रमाणे 679 प्रभारींची नियुक्ती केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शिफारसीनुसार मुन्ना अब्बास यांच्यावर आदिलाबाद विधानसभा निवडणुकीची जबाबदारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिली आहे.
मुन्ना अब्बास सध्या आदिलाबाद मतदारसंघ पिंजून काढत असून बीआरएसचे भूत येथेच गाडून टाका. त्याचे लोण महाराष्ट्रात येवू देवू नका असे आवाहन मतदारांना करीत आहेत. मतदारांचा प्रतिसाद पाहता तेलंगणात काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी होईल असा विश्‍वास मुन्ना अब्बास यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या