जवळ्यात माझा वाढदिवस माझा सन्मान उपक्रमास प्रतिसाद

नांदेड  - शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी आणि भरीव स्वरुपाची आंतरक्रिया घडून यावी यासाठी शिक्षकांकडून अनेक उपक्रम राबविले जातात. शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थी विद्यार्थी यांच्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण व्हावी, शालेय जीवनापासूनच सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली 

 'माझा वाढदिवस माझा सन्मान' या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमास चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पालक तथा आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, मनिषा गच्चे, हैदर शेख, कविता गोडबोले यांची उपस्थिती होती. 

        माझा वाढदिवस माझा सन्मान या उपक्रमाला विद्यार्थ्यांमध्ये खूपच प्रभावशाली आहे.‌ ज्या वर्गातील विद्यार्थ्याचा ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या वर्गातील मुले बुके तयार करतात. ते सर्वच जण इतरांना आमंत्रण देतात. मग सर्वच इयत्तांमधील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन वाढदिवस साजरा करतात. यानिमित्ताने चाॅकलेट्स वाटप करण्यात येतात. आनंदाची देवाणघेवाण होते आणि एकत्वाची भावनाही वाढीस लागते. इयत्तानिहाय व महिन्याप्रमाणे चार्ट तयार करून वर्गाच्या दर्शनी भागात डकविण्यात आला आहे. शैक्षणिक वर्षाच्या अर्धसत्रात जन्मदिनांकाप्रमणे उपक्रम राबविण्यात आला. दीपावली सुट्यांमुळे या उपक्रमास स्थगिती देण्यात आली. दुसऱ्या सत्रात नियोजन करून या उपक्रमास पुन्हा पुन्हा सुरुवात होणार असल्याचे मुख्याध्यापक ढवळे यांनी सांगितले.

टिप्पण्या