पूरग्रस्तांच्या मंजूर यादीमध्ये अफरातफर,बोगस लोकांच्या खात्यात पैसे जमा ; खरे पूरग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

 



सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड आक्रमक

नांदेड : २६-२७ जुलै रोजी नांदेड शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि अनेक गोरगरीब लोकांच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले होते.सीटू संलग्न नांदेड जिल्हा आतापर्यंत दहा आंदोलने करण्यात आली परंतु खऱ्या पूरग्रस्तांना डावलले आहे हा प्रश्न पुन्हा ऐरनीवर आला आहे. हजारो बोगस पूरग्रस्तांची बनावट यादी तयार करून नऊ कोटी रुपये आपल्या मर्जीतील लोकांना वाटप करण्याचा यशस्वी प्रयत्न मनपा आणि तहसील प्रशासनाने केला असून बोगस पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग होत असलेली प्रक्रिया तातडीने थांबवावी. बील कलेक्टर आणि तल्याठ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५६ आणि ५७ नुसार निलंबनाची कारवाई करावाई. तीन महिन्यापासून प्रत्यक्षात पाहणी करून नावे समाविष्ट करावीत म्हणून पूरग्रस्तांनी अर्ज केले होते. मग तलाठी आणि वसुली लिपिकांनी घरोघरी जाऊन पाहणी का केली नाही असे अनेक प्रश्न निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत.

तातडीने उर्वरित नावे घेण्यात येतील असे त्यांनी शिष्टमंडळास सांगितले.

या आंदोलना बरोबर कासारखेडा ता. जि. नांदेड येथील बचत गटाच्या पीडित महिला देखील सीटू च्या नेतृत्वाखाली कर्ज माफ करावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसल्या आहेत. तसेच वाजेगांव जिल्हा परिषद शाळेच्या शालेय पोषण आहार कामगार विविध मागण्यासाठी उपोषण करीत आहेत.

पूरग्रस्तांची अंतिम यादी अजून पूर्ण झाली नसून जोपर्यंत खऱ्या लाभार्त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु राहील अशी भूमिका सीटू कामगार संघटनेने घेतली आहे.

मौजे वझरा शेख फरीद ता.माहूर येथे मागील पन्नास वर्षात प्लॉट्स पडले नाहीत तेथे मागणी केलेल्या अर्जदारांना प्लॉट देण्यात यावा तसेच घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये सोलापूर कुंभारी च्या धरतीवर देण्यात यावेत ही मागणी देखील उपोषणात करण्यात आली आहे.

बोगस पूरग्रस्तांचा मुद्दा चार ते पाच कोटी रुपयाचा अपहार केल्याचे सिद्ध करेल असे सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी यावेळा संबोधित करताना सांगितले.

सदरील आंदोलनात शकडो लोक सामील झाले होते.

आंदोलनाचे नेतृत्व कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ.श्याम सरोदे, कॉ. कांताबाई तारू,कॉ.रेखा गजभारे,वर्षाताई हिंगोले, सविताबाई गायकवाड, सयाबाई राक्षसमारे,, कॉ. सोनाजी गायकवाड, कॉ. लता कांबळे, दैवशाला साबळे, बेगम बी शेख गफार, मेहरूण बेगम शेख हुजूर आदींनी केले आहे.सीटू च्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे. तर टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अहेमद बाबा बागवाले यांनी पाठींबा दिला आहे.

सुरु असलेले बेमुदत आंदोलन प्रश्न मार्गी लागल्याशिवाय संपणार नाही असा निर्णय संघटनेने घेतला असल्याचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पण्या
Popular posts
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
श्री दत्त शिखर संस्थांनच्या घटना नियमावलीत दुरुस्ती करा चिंतामण भारती महाराज यांचे श्री दत्त शिखर संस्थांनलां सूचना पत्र
इमेज
गिरणी कामगारांना घरे‌ मुंबईतच मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा !*
इमेज
शब्द ब्रम्हाची उपासना समजून लेखन करतो " साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचे संस्कार भारती गुरुपौर्णिमा उत्सवात प्रतिपादन*
इमेज
आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक _ देवेंद्र भुजबळ
इमेज