साडेसहा लाख रुपयांची लाच घेताना बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यास रंगेहात अटक ▪️ घरातून 73 लाख रुपये जप्त नांदेडच्या एसीबी पथकाची कारवाई

 

नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजपूत व त्यांचा एक कर्मचारी अशा दोन जणांना साडेसहा लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे बुधवारी दिनांक एक नोव्हेंबरच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली एवढेच नाही तर यानंतर गजेंद्र राजपूत यांच्या घरातून तब्बल 73 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे त्यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

 सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत केलेल्या कामाचा धनादेश काढण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत वय 54 वर्ष पद अधीक्षक अभियंता वर्ग एक आणि विनोद केशवराव कंधारे वय 47 वर्ष पद वरिष्ठ लिपिक वर्ग 3 यांनी लाचेची मागणी केली परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने दिनांक 31 ऑक्टोबर रोजी याबाबत तक्रार दिली वरील कामासाठी साडेसात लाख रुपयांच्या लाचीची मागणी करण्यात आली होती 31 ऑक्टोबर व एक नोव्हेंबर रोजी पडताळणी ही मागणी करण्यात आली तडजोडी आणती सहा लाख 40 हजार रुपये लाच त्यांनी स्वीकारली यातील तक्रारदार यांना केदारगुडा पिंगळी, डोंगरगाव हदगाव गोरलेगाव गुरफळी रोड तालुका हदगाव जिल्हा नांदेड या रस्त्यांचे दोन कामांचे टेंडर मिळाले होते सदर कामाच्या निविदा स्वीकृतीच्या शिफारसी साठी यातील तक्रारदार हे आलोसे गजेंद्र राजपूत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांना भेटले असता त्यांनी मंजूर झालेल्या दोन टेंडर चे एकूण 14 कोटी दहा लाख रुपयांचे अर्धा टक्के रक्कम सात लाख रुपयांच्या लाचीची मागणी केली सदर पैसे दिले तर पुढे मुख्य अभियंता नांदेड यांच्याकडे कामाची शिफारस करणार अन्यथा नाही असे त्यांनी सांगितले त्यानंतर तक्रारदार हे संबंधित टेबलचे लिपिक विनोद कंधारे यांना भेटले असता त्यांनी त्यांचे व त्यांचे सोबत असलेले लिपिक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडर चे 25 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली लाचे पोटी हे पैसे देण्याची इच्छा नसल्याने कंत्राट दाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे तक्रार दिली त्यानंतर 31 ऑक्टोबर 2023 रोजी व १ नोव्हेंबर 2023 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठवले असता तक्रारदार यांनी गजेंद्र हिरालाल राजपूत वय 54 वर्ष पद अधीक्षक अभियंता नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांची भेट घेतली व सात लाख रुपये जास्त होत आहेत काहीतरी कमी करा अशी विनंती केली असता अधीक्षक अभियंता राजपूत यांनी तडजोडी आणती सहा लाख रुपयांची पंचा समक्ष मागणी केली हे सहा लाख रुपये संबंधित लिपिक कंधारे यांच्याकडे देण्यास सांगितले त्यानंतर तक्रारदार हे संबंधित लिपिक कंधारे यांच्याकडे गेले व राजपूत साहेबांनी सहा लाख रुपये तुमच्याकडे देण्यास सांगितले व त्यांना दोन टेंडरचे प्रत्येकी 20 हजार रुपये असे एकूण सहा लाख 40 हजार घेण्यास वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांनी पंचा समक्ष होकार दर्शवला त्यानंतर दि 1नोव्हेंबर 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड चे कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून सहा लाख गजेंद्र हिरालाल राजपूत वय 54 वर्ष पद अधीक्षक अभियंता वर्ग एक यांच्यासाठी व आलोसे विनोद केशवराव कंधारे वय 47 वर्ष पद वरिष्ठ लिपिक वर्ग 3 नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्यासाठी दोन टेंडरचे 40 हजार रुपये असे एकूण सहा लाख 40 हजार पंचा समक्ष लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले यानंतर अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांचे कार्यालय व घराची झडती घेऊन लाज लुचपत प्रतिबंधक नांदेड पथकाने पंचा समक्ष एकूण 72 लाख 91 हजार 490 जप्त केले आहेत या दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्या असून नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड हे करीत आहेत

_लाच घेतल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम चे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत सह लिपिकास 5 दिवसाची पोलीस कोठडी जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या न्यायालयात उभे केले ,सरकार तर्फ ऍड. रणजित देशमुख यांनी बाजू मांडली_

टिप्पण्या
Popular posts
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
श्री दत्त शिखर संस्थांनच्या घटना नियमावलीत दुरुस्ती करा चिंतामण भारती महाराज यांचे श्री दत्त शिखर संस्थांनलां सूचना पत्र
इमेज
गिरणी कामगारांना घरे‌ मुंबईतच मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा !*
इमेज
शब्द ब्रम्हाची उपासना समजून लेखन करतो " साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचे संस्कार भारती गुरुपौर्णिमा उत्सवात प्रतिपादन*
इमेज
आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक _ देवेंद्र भुजबळ
इमेज