किनवट - बिलाच्या मंजुरीसाठी किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनात निराळा येथील ग्रामसेविकेला खुर्ची फेकून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दि.२ एकावर गुन्हा दाखल केला.
किनवट तालुक्याच्या निराळा येथील ग्रामसेविका सुशिला रावसाहेब पिंपळे ह्या गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त किनवट पंचायत समितीत आल्या होत्या.गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांच्या दालनात त्या बसल्या होत्या.त्याचवेळी निराळा येथील प्रदीप नंदकिशोर महल्ले हे वैष्णव यांच्या दालनात आले.मागील कामाच्या बिलाच्या मंजुरीच्या कारणावरुन महल्ले यांनी ग्रामसेविका सुशिला पिंपळे यांना अरेरावी करीत त्यांच्या अंगावर खुर्ची फेकून मारहाण केली.याप्रकरणी पिंपळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रदीप महल्ले यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३,३३६ नुसार गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात फौजदार झाडे अधिक चौकशी करीत आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा