मुंबई दि.२१ , भिन्न जाती धर्माचे लोक फक्त भाषेतील सुसंवादातून एकत्र येऊ शकतात.स्वातंत्र्याचा लढा याच तंत्राने यशस्वी झाला आहे, मात्र या गोष्टी कडे आता सकारात्मक दृष्टीने पाहिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित कौमी एकता सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाचे पुष्प गुंफताना केले. मुंबई विभागाच्या नायगांव गट कार्यालयाने शिवडी येथील कामगार कल्याण केंद्रात भाषिक सुसंवाद दिनानिमित्त बहुभाषिक कवी संमेलन दिनाक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडले. त्यावेळी राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे जनसंपर्क प्रमुख व कथा लेखक काशिनाथ माटल प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सुसंवादक दिगंबर राणे होते. प्रारंभी नायगांव गटाचे कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी व नाटककार महेंद्र कुरघोडे यांनी मराठी व हिदी भाषिक कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.. कवयित्री तथा प्रबंधक, न्यू इंडिया इन्शुरन्स ली. मुंबई chya श्रीमंती कृष्णा वशिष्ठ यांनी कौमी एकता या विषयावर हिंदी भाषेतून कविता सादर समेलनात रंगत आणली. कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर यांनी केलेली कविता उपस्थिताना अंतर्मुख करुन गेली. यावेळी दत्ता मोरे, गौतम भालेराव, अनत साळवी आदि मान्यवर उपस्थित होत. संमेलनाचे सूत्र संचालन अनिल लोखंडे केंद्र संचालक तर नियोजन केंद्र संचालक भाऊ नाटळकर, केंद्र उप संचालिका बेनझीर हवालदार यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबोधी सामाजिक संस्था, शिवडी यांनी मोलाचे सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा