बिलोली/प्
बिलोली शहरातील ग्रामीण रुग्णांलय,ग्रामीणस्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात उपचारासाठी येणाऱ्या सर्व महिला व पुरुष रुग्णांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सोई सुविधा रुग्णांलयात उपलब्ध करुन देणे,रुग्णांलयात येत असलेल्या सर्व अडी,अडचणी,समस्या सोडविणे
यासह ईतर प्रमुख उद्देशासाठी स्थानिक प्रत्येक तालुका स्तरावर राज्य शासनाच्या वतीने रुग्ण कल्याण समितीची स्थापना केली जाते.येथील रुग्णांलयात रुग्ण कल्याण समितीची स्थापना तर करण्यात आली आहे माञ हि समिती केवळ आलीशान बैठकी पुरतीच मर्यादित आहे का? गोर गरीब रुग्णांचे हाल होत आहे.येथील ग्रामीण रुग्णांलयात एवढ्या मोठ्या समस्या असताना देखील समितीने काय अॕक्शन घेतली आहे? फक्त कागदोपञी पुरते सदरिल समिती मर्यादित,कार्यरत आहे का? हि समिती केवळ नावालाच आहे का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
केंद्र शासनामार्फत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र हि केंद्र आरोग्य वर्धिनी केंद्रात रुपांतरीत करण्यात आली आहे.त्याअनुषंगाने शासनाने दि.२३ नोव्हेंबर २०22 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपञकानुसार सध्या कार्यरत रुग्ण कल्याण समितीच्या रचनेत,कार्यपद्धतीत सुधारणा करुन विशेष म्हणजे नावात बदल करुन आता जन आरोग्य समिती असे नामकरण करण्यात आले आहे.सदरिल जन आरोग्य समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जि.प.सदस्य,सहअध्यक्ष म्हणून तालुका आरोग्य अधिकारी,सचिव वैद्यकिय अधिकारी,सदस्य म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकिय अधिकारी,वरिष्ठ स्टाफ नर्स,ग्रामपंचायत आरोग्य उपसमितीचे सभापती,एकात्मिक बाल विकास विभागाचे पर्यवेक्षक,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी,शिक्षण विभागाचे अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,जनआरोग्य समितीचे चेअरमन,नेहरु युवा केंद्र प्रतिनिधी,नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थेचे प्रतिनिधी अशा व्यक्तिंचा या जन आरोग्य समितीत समावेश आहे.सध्या नांदेड येथील शासकिय जिल्हा रुग्णांलयात अनेक रुग्णांचे निधन झाल्याचे प्रकरण ताजे आहे.त्या अनुषंगाने आपल्या येथील ग्रामीण रुग्णांलयात सर्व सोयीसुविधा आहे का? त्या अद्यावत आहे का? हे पाहण्याच काम जनआरोग्य समितीचे आहे.दैनिक भास्कर ने येथील ग्रामीण रुग्णालयातील असुविधा बाबत मालिकाच सुरु केली आहे. रुग्णांलयात रुग्णांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही,महिला व पुरुषासाठी असलेले शौचालय,लघुशंकागृह,स्नानगृह हे अस्वच्छ असून,रुग्णांलयात विविध विभागातील तब्बल २८ पदे रिक्त आहे.रेडिओलाॕजिस्ट(तंञज्ञ) नसल्याने सोनोग्राफी मशिन बंद आहे,रक्त तपासणी अहवालासाठी दोन ते तिन दिवस प्रतिक्षा करावी लागते,औषधी बाहेरुन मागवले जाते,बेडवरचे बेडशिट व ईतर कपडे धुण्यासाठी सध्या माणुस नाही,डाॕक्टर मुख्यालयी राहत नाही ई.समस्या असताना देखील जनआरोग्य समिती या गंभिर विषयावर काय अॕक्शन घेतले आहे.हे सर्व पाहता सदरिल समिती फक्त नावालाच आहे असे दिसून येत आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा