शिवाजी पार्क येथे बंधुत्व फाऊंडेशनतर्फे स्वच्छता अभियान*

    मुंबई पोर्ट ट्रस्टमधील बंधुत्व फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने १ ऑक्टोबर २०२३ रोजी शिवाजी पार्क, चैत्...



    मुंबई पोर्ट ट्रस्टमधील बंधुत्व फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने १ ऑक्टोबर २०२३ रोजी शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर पश्चिम येथे स्वच्छता अभियान राबविले.

 शिवाजी पार्क चैत्यभूमी सागर किनाऱ्यापर्यंत जमा झालेले प्लास्टिक,थर्माकोल, निर्माल्य तसेच विविध प्रकारचा कचरा पिशव्यांमध्ये जमा करून कचरा गाडीमध्ये जमा केला. ड्युटीवर असलेले म्युनिसिपल सॅनिटरी सुपरवायझर, मुकादम व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समुद्र किनारपट्टीवर कचरा टाकून समुद्री जैव विविधतेवर परिणाम होऊन येथील सागरी मत्स्य संपदेवर मच्छीमार बांधवांची उपजीविका अवलंबून आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचा भाग आहे. संस्थेचे अध्यक्ष समीर राणे यांनी सर्वांचे स्वागत केले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष डॉ.यतीन पटेल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , स्वछता मोहीम,मेडिकल कॅम्प,ब्लड डोनेशन कॅम्प असो, सामाजिक उपक्रमामध्ये सर्व सहभागी झाले तर एक नवीन ऊर्जा मिळते. सहभागी झालेले सेवानिवृत्त कर्मचारी याना शुभेच्छा दिल्या.

स्वछता मोहीम यशस्वी करण्यासाठी समीर राणे, स्नेहा राणे,डॉ.यतीन पटेल, अरविंद जागडे, हेमंत वरळीकर, शशी नाईक, प्रकाश शिंदे, एस. डी. शिरसाठ, संजय तावडे, अशोक साबळे, संतोष नार्वेकर, गणेश वाडेकर, अरविंद लेले, विलास दिवेकर व सेवांनिवृत्त वरिष्ठ कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. मुंबई महानगर पालिकेतर्फे श्री. कांबळे यांनी बंधुत्व फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

आपला 

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group