जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत विनायक राठोड व रोहित जाधव अनुक्रमे प्रथम द्वितीय.

 



माहूर ( प्रतिनिधी )जिल्हा क्रीडा संचालनालयामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग कनिष्ठ विभागातून विज्ञान शाखेच्या 12 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विनायक अनिल राठोड व रोहित गणेश जाधव या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

      श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या सभागृहात दि.27 सप्टें. रोजी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बळीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला. नेमबाजी स्पर्धेत उज्ज्वल यश मिळविण्याची महाविद्यालयाची ही पहिलीच वेळ आहे. या यशाबद्दल संस्थेच्या सचिव संध्याताई राठोड, उपाध्यक्ष किशोर जगत, सहसचिव नकुल राठोड,प्राचार्य डॉ. तुळशीदास गुरनुले, पर्यवेक्षक प्रा. निलेश पाटील, क्रीडाशिक्षक प्रा. पी. व्ही. राठोड यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या