माहूर शहरातील गणपती विसर्जन उत्साहात



माहूर (प्रतिनिधी )

'  गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात आणि बँड, ढोल ताशे या पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या आवाजावर नाचणाऱ्या हजारो युवकांच्या उपस्थितीत मिरवणुकीने माहूर शहारातील तेराही सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे दि.29 सप्टें. रोजी रात्री उशीरा पैनगंगा नदी पात्रात विसर्जन झाले.

                    गणरायाच्या मिरवणुकीला दु.४ वा. सुरुवात झाली. मिरवणुक नगर पंचायत कार्यालयासमोर येताच नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, वैजनाथ स्वामी यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना नेते ज्योतिबा खराटे यांनी प्रत्येक गणेश मूर्तीला पुष्पमाला अर्पण करून अध्यक्षाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी त्यांचे समवेत ज्ञानेश्वर लाड, माजी सभापती उमेश जाधव व ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांची उपस्थिती होती. भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड,महिला मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्षा छाया राठोड,युवानेते सुमित राठोड,पद्माताई गिऱ्हे,प्रथम नगराध्यक्ष समरभाऊ त्रिपाठी, पुरोषोत्तम लांडगे, जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे,नंदकुमार जोशी, अपील बेलखोडे आदींनी गणेश मंडळाच्या सर्वच अध्यक्षांचे शाल श्रीफळ देवून स्वागत केले. 

   गणेश विसर्जन मिरवणूकीला कुठलीही बाधा निर्माण होऊ नये, ती शांततेत पार पडावी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.शिनगारे यांनी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले.त्यांच्या मार्गदर्शनात पो. नि. नितीन काशीकर,स. पो. नि. संजय पवार,सब इन्स्पेक्टर पालसिंग ब्राम्हण, आनंद राठोड व वाठोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मागील दहा दिवसात गणेश मंडळाने उभारलेले नयनरम्य देखावे, मनोभावे केलेली पूजा/अर्चा,विविध स्वरूपाच्या घेतलेल्या स्पर्धा, घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रम,महा प्रसादाचे केलेले आयोजन आदी बाबीमुळे शहरात सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरले होते.

     नदी पात्रात श्री च्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नगर पंचायतीने क्रेनची व्यवस्था केली होती.विसर्जन स्थळी पोलीस विभागाचे व न. पं. चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या