मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक सिंचन पद्धतीचा (ठिबक व तुषार सिंचन) अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा आणि उत्पादन वाढवावे, यासाठी शासनाच्या वतीने विविध सूक्ष्म सिंचन योजना राबविल्या जात आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी तातडीने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन मुखेडचे तालुका कृषी अधिकारी श्री. सचिन बोधमवाड यांनी केले आहे.
या संदर्भात माहिती देताना त्यांनी विविध घटकांसाठी देय असलेल्या अनुदानाची सविस्तर रचना स्पष्ट केली आहे:
१. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन)
ही केंद्र पुरस्कृत योजना असून, या अंतर्गत शेतकऱ्यांना ५ हेक्टरच्या क्षेत्र मर्यादेत खालीलप्रमाणे अनुदान दिले जातेः
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरीः ५५% अनुदान
इतर (मोठे) शेतकरीः ४५% अनुदान
२. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (राज्य पुरस्कृत पूरक अनुदान)
केंद्र सरकारच्या योजनेला जोडूनच राज्य शासनाच्या वतीने पूरक अनुदान दिले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरीः २५% अतिरिक्त पूरक अनुदान (केंद्र ५५% राज्य २५% = एकूण ८०% अनुदान)
इतर शेतकरीः ३०% अतिरिक्त पूरक अनुदान (केंद्र ४५% + राज्य ३०% = एकूण ७५% अनुदान)
३. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी विशेष सवलत
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अधिक आर्थिक पाठबळ देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे:
या प्रवर्गातील शेतकऱ्यांना उर्वरित १०% ते १५% अनुदान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना किंवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यांमधून अदा करण्यात येते.
त्यामुळे या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी एकूण ९०% च्या मर्यादित अनुदान उपलब्ध होणार आहे.
"पाण्याची बचत आणि पिकांची भरघोस वाढ करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन (सूक्ष्म सिंचन) अत्यंत गरजेचे आहे.
शासनाने या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ८० ते ९० टक्क्यांपर्यंत मोठे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. तरी मुखेड तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा."अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे

COMMENTS