'अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘थरार प्रेमाचा-अथिरन’* *८ मेपासून रंगणार ‘थरार प्रेमाचा-अथिरन’ ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’*हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसांत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी ‘थरार प्रेमाचा- अथिरन’ डिजिटल प्रीमियरची घोषणा करत आहेत. ८ मेपासून या अल्ट्रा झकासवर या चित्रपटाचा थरार रंगणार आहे. 


दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बहुचर्चित ठरलेल्या ‘अथिरन’ या मल्याळम भाषेतील चित्रपटाचा मराठीत डब केलेला ‘थरार प्रेमाचा- अथिरन’ हा चित्रपट एक्स्क्लुझिवली अल्ट्रा झकास ओटीटी अॅपवर पाहता येणार आहे. पुष्पाफेम अभिनेता फहाद फासिल, अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच दाक्षिणात्य दिग्दर्शक विवेक यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे. भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 


"कलाकारांची उत्तम फळी लाभलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाची रहस्यांनी आणि थराराने परिपूर्ण कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेले. दाक्षिणात्य सिनेविश्वात बहुचर्चित असणारा हा चित्रपट आम्ही मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट व अल्ट्रा झकासचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.


दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला 'अल्ट्रा झकास'वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. ५९ रुपयांत मासिक, १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. 

तर, लगेच डाउनलोड करा 'अल्ट्रा झकास ओटीटी' ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.

App link: https://ultrajhakaas.app.link

खालील लिंक्सवर ‘अल्ट्रा झकास’वरील ‘थरार प्रेमाचा- अथिरन’चा ट्रेलर पहा. 

https://www.youtube.com/watch?v=QAySixy0wlg

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://twitter.com/ultrajhakaas

https://www.instagram.com/p/CrvbdFYIb5J/

*प्रसिद्धी जनसंपर्क* : राम कोंडीलकर,

राम पब्लिसिटी, मुंबई 

ramkondilkar.pr@gmail.com

9821498658

टिप्पण्या