*सेलू येथे राज्य शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा उद्घाटन* *राज्य भरातून ४८० खेळाडू दाखल*


सेलू (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने

राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा ,( १७/१९) वर्षाखालील मुले/मुली) गटात

क्रीडा स्पर्धेचे दि. ५ ते ६ मे २०२३ या कालावधीत महेश ॲग्रो , रवळगांव रोड सेलू येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. 

सदरील स्पर्धेत राज्य भरातून ३२ मुले व मुली संघातील ४८० खेळाडू सेलू त दाखल झाले आहेत.

      सदरील कार्यक्रम खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

कार्यक्रम अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया अध्यक्ष नूतन शि.संस्था, माजी आ. विजय भांबळे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जि.प.सदस्य राजेंद्र लहाने, उद्योजक आर.बी.घोडके जयप्रकाशजी बिहाणी, सितारामजी मंञी, फ्लोअरबॉल जिल्हा अध्यक्ष अशोक काकडे, 

रविंद्र चोथवे सचिव महाराष्ट्र राज्य फ्लोअरबॉल असोसिएशन

, मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे ‌ .

परभणी जिल्हा क्रीडा प्रेमी , क्रीडा संघटक, खेळाडू, यांनी उपस्थित राहावे असे आवाहन 

नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी, तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, महेश खर्डेकर, प्रकाश होनवडजकर , जिल्हा सचिव प्रशांत नाईक, प्रा. नागेश कान्हेकर, डी.डी.सोन्नेकर, यांनी केले आहे.

टिप्पण्या